घरCORONA UPDATEराज्यात नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर

राज्यात नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६६६ वर गेली असून राज्यात २४ तासात नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आज राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६६६ वर गेली असून राज्यात २४ तासात नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे यामध्ये मुंबईचा आकडा ७२ इतका आहे.

  • मुंबई – ७२
  • औरंगाबाद – २
  • मालेगाव – ५
  • पनवेल – २
  • कल्याण – डोंबिवली – १
  • ठाणे – ४
  • पालघर – १
  • नाशिक ग्रामीण – १
  • नाशिक शहरी – १
  • अहमदनगर – १
  • पुणे – १
  • वसई – विरार – १

    एकूण – ९२

    - Advertisement -

    दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्याचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र, हा लॉकडाऊन सुरू ठेवायचा की संपवायचा याबाबतचा महत्त्वाचा निर्णय आज येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज, शनिवारी याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यामुळे देशातील परिस्थितीच्या अनुषंकाने ही एक महत्त्वाची बैठक असणार आहे. यापूर्वीच तब्बल ११ राज्यांनी देशातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा, असे सुचित केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन काढल्यास त्याचा संसर्ग आणखी वाढेल, अशी शक्यताही जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.


    हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; लॉकडाऊनवर फैसला होणार?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -