घरताज्या घडामोडीशाळांपाठोपाठ महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार- उदय सामंत

शाळांपाठोपाठ महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार- उदय सामंत

Subscribe

राज्यातील सर्व विद्यापिठाशी संबंधित वसतिगृहे ही विद्यार्थ्यांना काही कालावधी देऊन तसेच पूर्वसूचना देऊन वसतिगृहे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देऊनच हा निर्णय राबवावा असे उदय सामंत यांनी सांगितले.

काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे संकट राज्यावर घोंगावते आहे. मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त, कुलगुरू, शिक्षण अधिकारी यांच्या बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून सुरक्षितता प्राधान्यस्थानी आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच वसतीगृहाच्या बाबतीतला आढावा घेण्यात आला. राज्यातील परिक्षांबाबतचा आढावा घेतला असून कुठे कोणत्या परीक्षा सुरू आहेत याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे. हा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा प्राधान्यस्थानी आहे. त्यामुळेच सर्व अकृषी विद्यापिठे, अभिमत विद्यापिठे, स्वयंअर्थसहाय्यक विद्यापिठे, तंत्रनिकेतन, विद्यापिठांची संलग्न महाविद्यालयाचे वर्ग हे १५ फेब्रुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

विद्यापिठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने

यापूर्वीसारखेच ऑनलाईन शिक्षण पद्धतीने कॉलेजेसमध्ये शिक्षण सुरू राहील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. सर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. विजेची उपलब्धतता किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार नाही, याची काळजीही विद्यापिठांनी घेणे गरजेचे आहे. तसेच एखादा विद्यार्थी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह येणे किंवा विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या कारणामुळे त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची काळजीही विद्यापिठांनीही घेणे गरजेचे आहे असेही उदय सामंत म्हणाले. ही भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली असून अकृषी तसेच खाजगी विद्यापिठांमध्ये या नियमावलीचे पालन केले गेले पाहिजे असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले. कोंडवाना विद्यापीठ, जळगाव आणि नांदेड विद्यापीठ तीन ठिकाणी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असल्याने त्याठिकाणी परीक्षा ऑफलाईन होतील. त्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घ्यायच्या आहे. इतर विद्यापिठांच्या कुलगुरूंनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचे मान्य केल्याने या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतो आहोत हा निर्णय जाहीर करत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

परीक्षेच्या काळातील अडचणी आणि शंकाचे निरसन करण्यासाठी महाविद्यालयाच्या तसेच विद्यापिठाच्या ठिकाणी हेल्पलाईन तयार करा, अशाही सूचना दिल्या आहेत. विद्यापिठे तसेच कॉलेजेसने परीक्षांचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका या ऑनलाईनवर उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचेही निरसनही करणे अपेक्षित आहे.

वसतिगृह बंद करण्याचा निर्णय

राज्यातील सर्व विद्यापिठाशी संबंधित वसतिगृहे ही विद्यार्थ्यांना काही कालावधी देऊन तसेच पूर्वसूचना देऊन वसतिगृहे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देऊनच हा निर्णय राबवावा असे उदय सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

परदेशातून जे विद्यार्थी पीचएडी तसेच संशोशधनासाठी आले आहेत, त्यांची सर्व काळजी घेऊन विद्यापिठे बंद करू नयेत. त्यांची सर्व काळजी विद्यापिठांनी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. हे विद्यार्थी तातडीने परदेशात जाऊ शकत नाही, त्यामुळे परदेशी विद्यापिठासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यासाठी विशेष कॅम्प लावून हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील महापालिकांनीही विद्यार्थ्यांच्या कोरोना रूग्णसंख्येचा आकडा माहिती करून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. १५ ते १८ वयोगटातील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कॅम्प लावून लसीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

चित्रकला परीक्षा ऑनलाईन पद्धतीने

चित्रकला तसेच दहावीच्या आधीच्या परीक्षांच्या ग्रेस परीक्षांबाबतच्या मुद्द्यावर शंका उपस्थित करण्यात आली होती. पण कला संचलनालयला सूचना दिल्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत फेब्रुवारीपर्यंत हे ग्रेस मार्क मिळण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात ही स्पष्टताही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्यांनाही ही गैरसोय होऊ नये यासाठीची खबरदारी घ्यावी.

शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षकवर्ग यांचे लसीकरण पूर्ण व्हायलाच हवे. तसेच ५० टक्के उपस्थित राहताना उर्वरीत ५० टक्के वर्क फ्रॉम होम पद्धतीने उपस्थितीचे आदेश गुरूवारपासून देण्यात आले आहेत. विद्यापिठांनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चक्राकार पद्धतीने हे काम द्यावे असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

महाविद्यालयांसाठी लवकरच बैठक

आगामी काळात १५ फेब्रुवारीनंतर महाविद्यालयाबाबत काय निर्णय घ्यायचा यासाठी बैठकांमधून पुढचा निर्णय घेण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले. शिक्षक तसेच तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापुढच्या काळात कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करावेत. अकृषी विद्यापिठे, खाजगी आणि संलग्न विद्यापिठांसाठी हे नियम लागू असणार आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -