राज्यातील ‘या’ रस्त्याचे काम ५ दिवसात पूर्ण; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

राज्यभरातील अनेक खराब रस्त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) सामना करावा लागत असून निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी विलंब होतो. शिवाय, याच कारणामुळे रस्ते अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे राज्यातील अनेक रस्त्यांच्या दुरूस्तीचे (Road Repairing) काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

राज्यभरातील अनेक खराब रस्त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) सामना करावा लागत असून निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी विलंब होतो. शिवाय, याच कारणामुळे रस्ते अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे राज्यातील अनेक रस्त्यांच्या दुरूस्तीचे (Road Repairing) काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशातच माहाराष्ट्रातील (Maharashtra) अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील (amravati akola road) ७५ किलोमीटरच्या रस्ताची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ (guinness book of world records) मध्ये याची नोंद झाली आहे. या कारण म्हणजे महामार्गावरील ७५ किलोमीटरचा रस्ता अवघ्या पाच दिवसात पूर्ण झाला आहे. जलद आणि कमी वेळेत रस्त्याचे बांधकाम झाल्याने नवा विक्रम झाला आहे. (Maharashtra Amravati Akola road in Guinness Book Of World Records Nitin Gadkari)

गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र

राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. महामार्गावरील लोणी ते बोरगावमंजू या ७५ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम बिटूमिनस काँक्रीट पद्धतीने करण्यात आले आहे. विक्रमी वेळेत काम केल्याने गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित असून, रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा – Nitin Gadkari : इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रकबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

रस्त्याचे बांधकाम ३ जूनपासून

काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे बांधकाम ३ जूनपासून सुरू झाले होते. त्यानंतर या कामला उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रचंड गती देत ७ जून रोजी या महामार्गावरील ७५ किमीचा रस्ता बांधून पूर्ण केला. मात्र, कमी वळेत इतका मोठा रस्ता तयार करण्यात आल्याने या रस्त्याची दखल थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

हेही वाचा – Nitin Gadkari: औरंगाबादहून पुणे गाठा सव्वा तासात, नितीन गडकरींची सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची घोषणा

एक ऐतिहासिक क्षण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम झाला आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हणत, मला या टीमचे अभिनंदन करताना खूप आनंद होत आहे, असे म्हटले. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच, विक्रमी वेळेत काम पूर्ण केल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या.

याशिवाय, “राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि जगदीश कदम यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन. ७५ किलोमीटर अखंड बिटुमिनस काँक्रीट रस्ता टाकण्याचे काम तुम्ही पूर्ण केले. तुमच्या चिकाटी आणि कामाच्या बळावर नवे व्हिजन तयार होत आहे. सर्व इंजिनिअर आणि कामगारांचे आभार. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे”, असे गडकरी यांनी म्हटले.


हेही वाचा – विधान परिषदेची लगीनघाई; निंबाळकर, खडसे, अहिर, दरेकरांच्या उमेदवारीची चर्चा