केंद्राच्या ‘या’ योजनेतून राज्यातील तब्बल 2551 किलोमीटरच्या रस्त्यांना मान्यता

केंद्र सरकराने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2551 किलोमीटरच्या रस्त्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार आहे.

केंद्र सरकराने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2551 किलोमीटरच्या रस्त्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार आहे. (maharashtra approval of 2551 km of roads through pradhan mantri gram sadak yojana of the centre government)

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 2040 कोटी रुपयांच्या रस्त्यांना केंद्रीय ग्रामविकास विभागाकडून मान्यता मिळाल्याचे समजते. यामध्ये 1218 कोटी रुपये केंद्रीय हिस्सा आणि 821 कोटी रुपये राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे. या कामासाठी 80 लाख रुपये प्रति किलोमीटर येणार खर्च येणार आहे.

दरम्यान, याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी राज्य सरकराने 16 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत प्रस्ताव मांडला असल्याचे सांगण्यात आले असून, त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

याआधी औरंगाबाद पुण्यासह राज्यात सहा एक्स्प्रेस हायवे उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. हे सुमारे 75 हजार कोटी रुपयांचे ग्रीन एक्स्प्रेसवे हायवे असतील, यातील काही एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई आणि पुण्यातील प्रदूषणाची समस्या कमी होईल, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण तसेच इतर विकासकामांचे उद्घाटन झाले. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. औरंगाबादहून पुण्यापर्यंत हायवे तयार करण्यात येणार आहे. लवकरच त्याच्या कामाचा शुभारंभ होईल. हा हायवे झाल्यानंतर नागपूरहून पुण्याला अवघ्या सहा तासात जाता येईल. सध्या हा प्रवास सुमारे 17 तासांचा आहे, असा दावाही नितीन गडकरी यांनी केला होता.


हेही वाचा – मंत्रिमंडळाच्या निर्णयक्षमतेवर सरकारचेच प्रश्नचिन्ह, ‘त्या’ शासन निर्णयावर अशोक चव्हाणांची टीका