Live Maharashtra Assembly : विधानसभेचे आजचे कामकाज संपले

maharashtra assembly budget 2023-24

विधानसभेचे आजचे कामकाज संपले


विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले


शीतल म्हात्रे मॉर्फिंग व्हिडीओच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना- राज्य सरकारची विधानसभेत घोषणा


देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे अजित पवारांनी काढले वाभाडे

फडणवीसांनी अर्थसंकल्पातील भाषणात दोन मुद्दे गाळले – अजित पवार

त्यांनी गाळलेले मुद्दे सभागृहातील रेकॉर्डवर आलेले नाहीत, या मुद्द्यांचं काय होणार, याची माहिती द्यावी

मुद्दा १२६ आणि १५६ गाळला गेला

१२६ मुद्दा – मानसिक अस्वास्थ्य व्यसनाधिनता दूर करणे
१६५ मुद्दा- स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मारक


जुन्या पेन्शन योजनेबाबत तातडीने निर्णय नाही

पुन्हा होणार बैठक, राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक

जुन्या पेन्शन योजनेबाबत समिती नेमणार


सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर सिक्युरिटिजचा प्रोजेक्ट आणणार- देवेंद्र फडणवीस

सायबर क्राईम, बदनामी प्रकरणांत तत्काळ कारवाई झाली तरच दुष्परिणाम टाळता येतात. अतिशय योग्य असा प्लॅटफॉर्म तयार केला जातोय. ज्यात सोशल मीडिया, बँकिंगसारख्या रोबोस्ट व्यवस्था येईल. सायबर क्राईमच्या संदर्भातील चळवळ अधिक मोठी झाली पाहिजे. प्रतिक्षित मॅनपावर तयार करतोय. त्याची करावाई सुरू केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


जुनी पेशन योजना संदर्भात चर्चा करण्यासाठी सीएम विधिमंडळ दालनात बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे यांसह प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थितीत


मुंबई-गोवा महामार्गाप्रश्नी सभागृहात चर्चा


कॅन्सरमुक्त महाराष्ट्र राबवणार, चाचण्या आरोग्य विभागातर्फे केल्या जातील

राज्यातील चाळीस वैद्यकीय महाविद्यालयात केवळ कर्करोगासाठी एक वार ठरवून तपासणी केली जाणार


जुन्या पेन्शन योजनेबाबत विधिमंडळात बैठक

शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शासनाला निवेदन देण्याचे निर्देश

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आजच्या दिवसाचे कामकाज संपण्याआत निवेदन देण्याचे निर्देश

शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी सखोल चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करा

सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब

शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणाचे विधानसभेत पडसाद

आमदार यामिनी जाधव यांनी मांडला पाँईंट ऑफ इन्फोर्मेशन

आमदार मनीषा चौधरी संतापल्या, मास्टरमाईंड शोधून कारवाई करण्याची मागणी


कांद्याला पुरवठ्यापेक्षा कमी मागणी

शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांना सानुग्राह अनुदान म्हणून प्रतिक्विंटल ३०० रुपये देणार


विधान परिषदेच्या प्रतोद पदाच्या पत्रकात मोठी चूक

एकनाथ खडसेंच्या नावाऐवजी एकनाथ शिंदेंचं नाव


विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन


कागद समोर ठेवून फोनवर बोललं जातं, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची सभागृहातील सदस्यांबाबत तक्रार


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात