Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Assembly 2024 : महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे नागरिकांना आवाहन; म्हणाले...

Maharashtra Assembly 2024 : महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे नागरिकांना आवाहन; म्हणाले…

Subscribe

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. तसेच त्यांनी राज्यातील जनतेला देखील मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. राज्यभरात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यातच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावला आहे. तसेच त्यांनी राज्यातील जनतेला देखील मतदान करण्याचे आवाहन केले आहे. (Municipal Commissioner appeals to citizens to vote.)

हेही वाचा :Devendra Fadanvis : माझं स्पष्ट मत आहे… बिटकॉइन प्रकरणांबाबत काय म्हणाले फडणवीस?

- Advertisement -

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला मतदानाचे आवाहन केले आहे. मी मतदान केले आहे, मुंबईकरांनो तुम्ही सुद्धा मतदान करा असे यावेळी ते म्हणाले आहेत. मी माझा मतदानाचा अधिकार बजावला आहे. मुंबईकरांनो जास्तीत जास्त मतदान करा. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे फक्त कर्तव्य नसून ती राष्ट्रीय जबाबदारी आहे. त्यामुळे आता मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा आणि लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भूषण गगराणी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Maharashtra Assembly 2024 : निवडणुकीसाठी आज मतसंग्राम; दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला

- Advertisement -

यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी आपल्या देखील आपल्या कुटुंबासोबत एस. एन. डी. टी विद्यापीठ येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.

निवडणूक आयोग, यंत्रणा आणि संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी मतदानासाठी आवश्यक संपूर्ण तयारी केली आहे. मतदारांसाठी पाणी, बसण्यासाठी खुर्ची, टेबल, पंखे, मंडप, वैद्यकीय सेवा अशा सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी आता गैरसोयीबाबत कोणतीही तक्रार येऊ नये, यासाठी सर्व खबरदारी घेऊन मतदानाची तयारी केली आहे. तसेच मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे फक्त कर्तव्य नसून ती राष्ट्रीय जबाबदारी आहे. त्यामुळे आता मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा आणि लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भूषण गगराणी यांनी माध्यामांशी बोलताना म्हणाले आहेत.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -