मुंबई : आज विधानसभेच्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या मुंबई महानगर परिसरातील 67 जागांसाठी मतदान पार पडत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईचा कौल नक्की कुणाला मिळतोय याकडे सर्वांचेच लक्ष आहे. शिवसेनेतील पक्षफुटीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने असणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. (Thackeray shindes reputation is at stake in mumbai thane attention to constituencies.)
हेही वाचा : Physical Assault : क्षुल्लक वादातून भाजी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला; रेकॉर्डवरील दोघांना अटक
आज राज्यातील अनेक नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. राज्यातील अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून यंदाची विधानसभा निवडणूक चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी शिवसेना पक्षात बंडखोरी केल्यानंतर ही शिवसेनेची पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही गमावले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने यंदाच्या निवडणुकीमध्ये भावनिक मुद्याला हाती घेतला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने विकासकाम आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आधारावर जनतेला मतदानाचे आवाहन केले आहे. मात्र आता जनता नक्की कोणाच्या बाजूने असणार आहे, ते महत्त्वाचे आहे. तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना की उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन पैकी कोणाला मुंबई महानगरातील मतदारांची पसंती मिळते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Maharashtra Assembly 2024 : साम, दाम, दंड, भेदाचे ‘ट्रेण्ड’ बदलले !
गेल्या काही वर्षांत शिवसेनेला मागे टाकून भाजपाने मुंबई परिसरामध्ये आपले हात-पाय पसरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईत भाजपाला किती जागा मिळतात तसेच भाजपा खरचं मोठा भाऊ ठरणार का? याची उत्सुकता आहे. तसेच महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर असल्याने काँग्रेसला जागावाटपात तडजोड करावी लागली. त्याबद्दल या पक्षात नाराजी होती. या घडलेल्या सर्व घडामोडींचा या होणाऱ्या मतदानांवर कसा परिणाम होतो हे येत्या 23 नोव्हेंबरला समोर येणार आहे. तसेच नक्की राज्यात कोणाची सत्ता येईल हे 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. तसेच मुंबई महानगरातील एकनाथ शिंदेंची शिवसेना की उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन पैकी कोणाला मुंबई महानगरातील मतदारांची पसंती मिळते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Edited By Komal Pawar Govalkar