मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नुकताच पार पडली. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट बहुमत महायुतीच्या बाजूने दिल्याचे पाहायला मिळाले. यंदा विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी बऱ्याच मतदारसंघातील निकाल अनपेक्षित लागले. (Maharashtra Assembly 2024 the MLA who won the assembly elections by low margin)
राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांना धूळ चारत महायुती सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, निकाल जरी अनपेक्षित लागले असले तरी, काही आमदार हे 1000 हून कमी मतांनी विजयी झाले तर काही आमदार कमी मार्जिनने विजयी झाले, म्हणजेच या आमदारांचा निसटता विजय झाला आहे.
- Advertisement -
काठावर विजयी झालेले आमदार कोण?
- बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे 377 मतांनी विजयी झाल्या आहेत. मंदा म्हात्रे यांना एकूण 91852 मतं मिळाली आहे. मंदा म्हात्रे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून संदीप नाईक यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला असून संदीप नाईक यांना 91475 मतं मिळाली आहेत.
- बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे 841 मतांनी विजयी झाले आहेत. संजय गायकवाड यांना एकूण 91660 मतं मिळाली आहे. संजय गायकवाड यांच्याविरोधात जयश्री शेळके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवली होती. परंतू, जयश्री शेळके यांचा पराभव झाला असून, त्यांना 90819 मतं मिळाली.
- मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती हे 162 मतांनी विजयी झाले. मौलाना मुफ्ती यांना एकूण 109653 मतं मिळाली. मौलाना मुफ्ती यांच्याविरोधात आसिफ शेख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. आसिफ शेख यांना 109491 मतं मिळाली.
- साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार नाना पटोले हे 208 मतांनी विजयी झाले आहेत. नाना पटोले यांना 96795 मतं मिळाली. नाना पटोले यांच्याविरोधात अविनाश ब्रह्माणकर यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. अविनाश ब्रह्माणकर यांना 96587 मतं मिळाली.
- अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार साजिद खान हे 1283 मतांनी विजयी झाले. साजिद खान यांना 88718 मतं मिळाली. साजिद खान यांच्याविरोधात भाजपकडून विजय अग्रवाल यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. विजय अग्रवाल यांना 87435 मतं मिळाली.
- नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक हे 1121 मतांनी विजयी झाले. शिरीषकुमार नाईक यांना 87166 मतं मिळाली. शिरिषकुमार यांच्याविरोधात अपक्ष म्हणून शरद गावित यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. शरद गावित यांना 86045 मतं मिळाली.
- कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे 1243 मतांनी विजयी झाले. रोहित पवार यांना 127676 मतं मिळाली. रोहित पवार यांच्याविरोधात भाजपकडून राम शिंदे यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. राम शिंदे यांना 126433 मतं मिळाली.
- जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनंत नर हे 1541 मतांनी विजयी झाले. अनंत नर यांना 77044 मतं मिळाली. अनंत नर यांच्या विरोधात शिवसेनेकडून मनिषा वायकर यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. मनिषा वायकर यांना 75503 मतं मिळाली.
- वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार हारून खान हे 1600 मतांनी विजयी झाले. हारुन खान यांना 65396 मतं मिळाली. हारुन खान यांच्याविरोधात भाजपकडून भारती लव्हेकर यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. भारती लव्हेकर यांना 63796 मतं मिळाली.
- माहिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत हे 1316 मतांनी विजयी झाले. महेश सावंत यांना 50213 मतं मिळाली. महेश सावंत यांच्याविरोधात शिवसेनेकडून सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. सदा सरवणकर यांना 48897 मतं मिळाली. याशिवाय महेश सावंत यांनी मनसेच्या अमित ठाकरे यांचाही पराभव केला.
- पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काशिनाथ दाते हे 1526 मतांनी विजयी झाले. काशिनाथ दाते यांना 113630 मतं मिळाली. काशिनाथ दाते यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राणी लंके यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. राणी लंके यांना 112104 मतं मिळाली.
- आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील हे 1523 मतांनी विजयी झाले. दिलीप वळसे पाटील यांना 106888 मतं मिळाली. दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवदत्त निकम यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. देवदत्त निकम यांना 105365 मतं मिळाली.
हेही वाचा – Maharashtra Assembly Results : विधानसभा निवडणुकीत 1000 पेक्षा कमी मतांनी विजयी झालेले आमदार कोण?