Live Assembly Budget 2023 : हा तर गाजर हलवा अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे

maharashtra assembly budget 2023-24

सावित्रीबाई फुले शाळेसाठी ५० कोटींच्या निधीची तरतूद

क्रयशक्ती वाढवण्याकरता १० हजारावरून २५ हजार रुपये वेतन असलेल्या महिलांना व्यवसाय कर भरावा लागणार नाही


प्रथम अमृत : शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, विभागांसाठी तरतूद

– कृषी विभाग : 3339 कोटी रुपये
– मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये
– सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये
– फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये
– अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये
– पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये
– जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये
– पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये
– मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये
……….
प्रथम अमृत एकूण : 29,163 कोटी रुपये


द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास विभागांसाठी तरतूद
– महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये
– सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये
– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये
– इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये
– दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये
– आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये
– अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये
– गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये
– कामगार विभाग : 156 कोटी रुपये
………….
द्वितीय अमृत एकूण : 43,036 कोटी रुपये


रस्त्यांसाठी निधी…

– पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी
– विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद
– रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी
– हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते/90,000 कोटी रुपये
– आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते/4000 कोटी रुपये
– रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्‍यांची कामे
– जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : 4500 कि.मी./3000 कोटी रुपये
– प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : 6500 कि.मी.
– मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना
– सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योज


आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटी

– आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना
– बंजारा तांडे रस्त्यांनी जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना
– धनगर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना
– या तिन्ही योजनांसाठी सुमारे 4000 कोटी रुपयांची तरतूद


मेट्रो प्रकल्प….

– मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला
मुंबईतील नवीन प्रकल्प
– मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी
– मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये
– मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये
– नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी
– पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर
– अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो


रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण

– नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
– सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
– नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार
– सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल
– 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी


विमानतळांचा विकास…

– शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी
– छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
– नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
– पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
– नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
– बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे


बोलण्यावर नाही, कृतीवर भर मुंबईचा सर्वांगिण विकास

– मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये
– एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण
– ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये
– गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी


विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत

– 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये
– 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार


शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
– माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
– पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये


महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार

– महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
– त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार
– नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
– मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
– राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य

– अंत्योदयाचा विचार
– संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
– राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार
– प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार

– ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करणार
– ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार
– वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणे, अन्य सुविधा उपलब्ध करून देणार

विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी

– बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत
– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देणार
– संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून देणार
– छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये

नवीन महामंडळांची स्थापना भरीव निधी सुद्धा देणार

– असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
– लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
– गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
– रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
– वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
– ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
– प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार


महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट

संपूर्ण बातमी वाचा मोठी बातमी! ST प्रवासात महिलांना तिकीटदरात सरसकट ५० टक्के सूट


लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची… ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

– मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
– पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
– जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
– पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
– अकरावीत 8000 रुपये
– मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये


२ ते ९ जून २०२३  शिवमहोत्सवासाठी होणार

शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा काढता येणार

सोहळ्यासाठी ३५० कोटी निधीची तरतूद

राज्याच्या अर्थसंकल्प वाचनाला फडणवीसांकडून सुरुवात

तुकोबा रायांना अभिवादन करून वाचनाला सुरुवात

अर्थमंत्री म्हणून आणि महाराष्ट्राच्या अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प, लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर सादर करताना मला अत्यानंद होतोय


बळीराजाला यंदाचा अर्थसंकल्प समर्पित : दीपक केसरकर


ठाण्यातील काळू धरणावर विधानसभेत लक्षवेधी चर्चा;

ठाण्यातील पाणी प्रश्नावरून विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न


विरोधकांकडून सोयीचं राजकारण सुरू – मुख्यमंत्री

नागालँडमध्येही पन्नास खोके एकदम ओके झालंय का? – गुलाबराव पाटील


शेतकरी प्रश्नावरून विरोधकांचा विधानसभेत सभात्याग

शेतकरी प्रश्नांवरून मुख्यमंत्री विरोधकांवर संतापले

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सभागृहात गोंधळ

कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याची आत्महत्या – अजित पवार

शेतकरी प्रश्नावरील स्थगन प्रस्ताव मंजूर करा आणि चर्चा होऊ द्या – छगन भुजबळ

सभागृहात विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी


अश्विनी जगताप यांचा शपथविधी

रवींद्र धंगेकर यांनीही घेतली आमदार पदाची शपथ


विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात