Live Assembly Budget : विधानसभेचे आजचे कामकाज संपले

maharashtra assembly budget 2023-24

विधानसभेचे आजचे कामकाज संपले


जितेंद्र आव्हाड यांना मिळालेल्या धमकीचा तपास सीआयडी करणार- देवेंद्र फडणवीस


सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ- यशोमती ठाकूर

मुंबई क्राईमचं हब बनतंय का हे पहावं


जो निर्णय होईल तो पूर्वलक्ष्यीप्रमाणे होईल- देवेंद्र फडणवीस

जुन्या पेन्शनबाबत उपमुख्यमंत्र्यांचा कर्मचाऱ्यांना दिलासा


विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर प्रश्न विचारायला उभे असताना सभापती नीलम गोऱ्हे मिश्किल पणे म्हणाल्या की तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत, पुढील मंत्री आहात, सतत कसे प्रश्न पडतात.


पायऱ्यांवर उभे राहून विरोधकांकडून इव्हेंट – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र ग्रोथ ट्रेंड कमी झालेला नाही, वाढत आहे- फडणवीस

पाऊस कमी झाली रेट कमी होतो, पण आता चांगला पाऊस असल्याने कृषी क्षेत्रातही ग्रोथ रेट डबल डिजिटमध्ये आहे

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक – फडणवीस

शेतकऱ्यांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प- फडणवीस


संपामुळे राज्यातील आरोग्यसेवा कोलमडली – अजित पवार

राज्यातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. एच३एन२ चे रुग्ण वाढत आहेत. केंद्रानेही सूचना केल्या आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये मृत्यू झाले आहेत. अत्यावश्यक शस्त्रक्रिया मोठ्याप्रमाणात पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १५० शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय झाला. जेजे रुग्णालयात मेस्मा कायद्याच्या प्रती फाडल्याच्या बातम्या येत आहेत. जन्म मृत्यूची नोंदणी बंद पडली. अवकाळी पीकांचे पंचनामे थांबले. एका बाजूला संप सुरू, कोणत्या वेळी काय केलं पाहिजे हे सरकारला कळलं पाहिजे. प्रशासन, शिक्षण आरोग्य व्यवस्था ठप्प झाल्या आहेत.


मंत्र्यांच्या उपस्थितीवरून अजित पवार आजही संतापले

संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील तरी येऊन बसले पाहिजेत

त्यांनी जर जबाबदारी घेतली आहे, तर येऊन बसा ना

आज फक्त मंगलप्रभात लोढांचा लक्षवेधी झाली, जनाची नाही मग मनाची तरी काही वाटत नाही

काल १ वाजेपर्यंत बसून पुन्हा आज सकाळी ९ वाजता दोन्ही बाजूचे मंत्री आले

मंत्री झाल्यानंतर सभागृहाची परंपरा, वैधानिक काम आहे

आज आठ लक्षवेधी होत्या, मंत्री उपस्थित नसल्याने सात लक्षवेधी पुढे ढकलल्या

एक वाजेपर्यंत आमचेही सदस्य बसले


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात