Live Assembly Budget 2023 : विधान परिषदेचे आजचे कामकाज संपले

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आजपासून चौथ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. आज दोन्ही सभागृहात कोणते मुद्दे उचलले जात आहेत हे पाहण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.

maharashtra assembly budget 2023-24

विधान परिषदेचे आजचे कामकाज संपले

सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती


हक्कभंग नोटीशीवर संजय राऊतांचे उत्तर

मी विधिमंडळाचा अवमान केलेला नाही, माझं वक्तव्य तपासा – संजय राऊत

माझ्याविरोधात हक्कभंग आणणं हा सत्ताधाऱ्यांचा डाव – संजय राऊत

हक्कभंग समितीतील सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवाल – राऊत


– मुंबईत होणाऱ्या प्रदुषणाबाबत पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हायपावर कमिटी बनवली आहे – दीपक केसरकर

– अद्यावत यंत्रणा वापरण्याचे आदेश दिलेत

– इलेक्ट्रिकल बसेस याकरता आणल्या

– मुंबई उपनगरात रिक्षांची संख्या मोठी आहे, त्याचे इलेक्ट्रिकमध्ये रुपांतर करणे महाग आहे, पण सीएनजी करणे सोपे आहे


कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आमदार पदाची पेन्शन नाकारली

जुनी पेन्शन योजनेवरून तोडगा निघत नसल्याने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी आमदार पदाची पेन्शन नाकारली

आमदार म्हात्रेंचं विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र


शेतकरींओंके सन्मान मे महाराष्ट्र सरकार मैदान मे- सुधीर मुनगंटीवार

उद्यापर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले – शंभुराज देसाई

याद्या प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांच्याबाबत सरकार सहानुभूतीने निर्णय घेणार


शेतकरी प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग

विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही -गिरीश महाजन

गारा वितळल्यावर पंचनामे कसे करणार? – अजित पवार

आकडेवारी आल्यावर नुकसान भरपाई जाहीर करू – विखे पाटील

नुकसान भरपाईबाबत सभागृहात विरोधक आक्रमक

संबंध देशात उघड्या आभाळाखाली व्यवसाय करणाऱ्यांची जात शेतकऱ्याची – धनंजय मुंडे

सर्व पिके घेणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला

आभाळ फाटलंय म्हणून शेतकऱ्याचं नशिब फाटलंय

परभणीत आठ जणांचा मृत्यू, पशुधन गेलंय

मागचं अनुदान मिळालेलं नाही


विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

नुकसान भरपाईसाठी विरोधक आक्रमक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा


विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात