घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Budget Session 2021 : कर्नाटक प्रश्नावर महाराष्ट्र सरकारची ठाम भूमिका...

Maharashtra Assembly Budget Session 2021 : कर्नाटक प्रश्नावर महाराष्ट्र सरकारची ठाम भूमिका – राज्यपाल

Subscribe

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. राज्य सरकारने कोरोनासारख्या संकटात केलेली कामगिरी, कोविड योद्ध्यांच्या गौरव आणि राज्यावर आलेल्या संकटाला सामोरे जाताना राज्य सरकारने ही परिस्थिती कशी हाताळली याचाच उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात करण्यात आला. त्यासोबतच राज्य सरकारची कर्नाटक प्रश्नाबाबतची तयारी आणि भूमिकाही राज्यपालांनी यावेळी सांगितली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार नेमक काय करत आहे याची माहिती राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांनी आपल्या भाषणात दिली. त्यामध्ये माझे शासन हे कर्नाटक भागाच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून त्याअनुषंगानेच राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Maharashtra Assembly Budget Session 2021 begins with governor Bhagat Singh koshyari’s speech)

महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या संकटा विरोधात तयार केलेल्या पॅटर्नची दखल ही देश तसेच जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. तसेच मुंबईतील धारावी पॅटर्नचा गौरव हा जागतिक पातळीवर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचे संकट डोक वर काढत असतानाच राज्यात कोरोनाची टास्क फोर्स आणि आरोग्य सुविधांमध्ये करण्यात आलेली वाढ यामुळे कोरोना नियंत्रणात राज्य सरकारला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनासंदर्भात आगामी काळात उपाययोजना करण्याची गरज आहे. दुसरी लाट येत असतानाच आपण अधिक काळजी घेणे अतिशय गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. तसेच राज्याच्या महसूली उत्पन्नातही घट झाल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. संपुर्ण अर्थव्यवस्थेलाच कोरोनाचा फटका बसलेला आहे हे सांगतानाच केंद्राकडून राज्य सरकारला अजुनही मोठ्या प्रमाणात जीएसटी परतावा येणे अपेक्षित आहे याचाही उल्लेख राज्यपालांनी यावेळी केला. औद्योगिक मंदीतही राज्य सरकारने अतिशय चांगले काम केले. त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारकडून महारोजगार आणि जॉब्ज पोर्टल सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना अतिवृष्टी, चक्रीवादळ तसेच अवकाळी पाऊस यासारख्या संकटातही राज्याने मदत केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसेच कोरोनाच्या संकट काळात स्तनदा माता, गर्भवती महिलांना घरपोच शिधा पोहचवतानाच गरजूंसाठी शिवभोजन थाळीही पुरवल्याचा उल्लेख राज्यपालांनी यावेळी केला.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -