घरमहाराष्ट्रविधानभवनाबाहेर वीजबिल दरवाढीविरोधात भाजपची निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

विधानभवनाबाहेर वीजबिल दरवाढीविरोधात भाजपची निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

Subscribe

राम सातपुतेंचे गळ्यात वीज पंप घालून आंदोलन

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्ष भाजपकडून ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वीजबिलांविरोधात ही घोषणा बाजी करण्यात आली. कोरोना काळात केलेली वीजदरवाढ कमी करावी आणि वीज खंडीत करणे तात्काळ थांबवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून ठाकरे सरकार हाय हाय, वीज बिल माफ करा अशा घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते. भाजपाने वीज दरवाढीविरोधात विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर ठीय्या आंदोलन करत निदर्शने केली. यावेळी भाजप नेते राम सातपुतेही उपस्थित होते. त्यांनी आपल्य गळ्यात वीज पंप घातला होता. सरकारने जर वीज माफ केली नाही तर वीज पंप सरकारच्या डोक्यावर टाकू असे राम सातपुते यांनी म्हटले आहे.

भाजप नेते राम सातपुतेंनी विधीमंडळ परिसरात वीजदरवाढीविरोधात आदोलन केले. राम सातपुतेंनी वीज पंप, मीटर आपल्या गळ्यात घातला होता. तसेच वीज बिले दाखवत निदर्शने केली. विधानसभा अधिवेशनाचा आज मंगळवारी (२मार्च) दुसरा दिवस आहे. अधिवेशनात वीज बिलवरुन घमासान होणार असल्याचे दिसते आहे. विरोधी पक्षाने वीज दरवाढीचा विषय चांगलाच लावून धरला आहे. महाराष्ट्राती जनतेची फसवणूक केली आहे. ठाकरे सरकार शेतकऱ्याचे वीज कनेक्शन खंडीत करण्यात आला आहे. ग्रमीण भागातील जनतेला वीज वाढीमुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने वीज वाढ करण्याचा धंदा सुरु केला आहे. असे भाजप नेते राम सातपुते यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : तुर्तास घरगुती, कृषी ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम स्थगित – राज्य सरकारचे आदेश


भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, आज विधान परिषदेमध्ये जर शेतकऱ्यांचे कनेक्शन सरसकट जोडण्याचे आदेश दिले जात नाहीत तोवर विधानपरिषदेचे कामकाज चालू देणार नाही. राज्य सरकारचे बड्या बिल्डरांना खैरात वाटत आहे. आणि राज्यातील जनतेवर अन्याय करत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -