घरताज्या घडामोडीसरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली - मुनगंटीवार

सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली – मुनगंटीवार

Subscribe

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि वसतीगृहाबाहेरील पुरुष मंडळी वसतिगृहातील तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. याचप्रकरणावर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (maharashtra assembly budget session 2021) तिसऱ्या दिवशी खडाजंग पाहायला मिळाली. याप्रकरणातील पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करण्यात आली. तसेच जर अशाप्रकारे महाराष्ट्रात आमच्या आई-बहिणीची थट्टा होत असेल राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. पण यासंदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हरकत घेऊन सुधीर मुनगंटीवार यांची ही मागणी कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. तसेच पुन्हा हे भाष्य पुढील कामकाजात वापर नये, असं देखील मलिक यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मुनगंटीवार यांचं राष्ट्रपती राजवटबाबतचं संबंधित वाक्य तपासून कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं.

सुधीर मुनगंटीवार प्रचंड संताप व्यक्त करत म्हणाले की, ‘अतिशय गंभीर विषय सभागृहात उपस्थित केला आहे. अशा पद्धतीने तुमच्या माझ्या आई-बहिणाला नग्न करून नाचालया लावलं जातंय. त्याची फक्त आम्ही नोंद घेऊ का? इथे मृत मनाचे आमदार, मंत्री आहेत. पण आमचं मन जिवंत आहे. अशा घटनेमुळे तळ पायाची आग मस्तकात गेली पाहिजे. एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे, तो अहवाल आम्ही देतो, असं आम्हाला उत्तरामध्ये सांगितलं पाहिजे. फक्त नोंद घेतो नाही. तुम्हाला हे पाप फेडावं लागेल.’

- Advertisement -

पुढे मुनगंटीवार म्हणाले की, ‘आताची घटना असून पोलिसांकडे याबाबत माहिती असूनही आता जाऊन चौकशी करायची नाही आहे? १५ हजार कोटी खर्च केल्यानंतर पोलीस यंत्रणा जर माहितीच घेतं नसेल तर कशासाठी सरकार? राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. या सरकारवर राष्ट्रपती राजवट आणायची वेळ आली आहे. मी संविधानाचा सन्मान करणारा व्यक्ती आहे. पण तुम्ही १०१ पाप केली त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट शिवाय पर्याय नाही. आमच्या आई-बहिणीची थट्टा केली जात असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग आहे.’


हेही वाचा – फडणवीसांच्या वृक्ष लागवडीच्या ‘ड्रीम’ प्रोजेक्टची होणार चौकशी, समितीला ६ महिन्यांची मुदत – अजितदादा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -