Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सरकारच्या मानसिकतेवरच हल्ला, इंधन दरवाढीवरून दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारच्या मानसिकतेवरच हल्ला, इंधन दरवाढीवरून दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

पेट्रोल,डिझेल आणी गॅस दरवाढीविरोधात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे. राज्यात टॅक्स आणि करात होणाऱ्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होते केंद्राकडून काहीही वाढ केली जात नाही. देवेंद्र फडणवीसांच्या काळात ५ रुपये भुर्दंड राज्यात घेतला होता. देशातील इतर काही जिल्ह्यांत पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी आहेत त्या राज्याची मानसिकता तशी आहे केंद्राने तिकडे वेगळा दर दिला नाही. राज्य सरकारची मानसिकता नाही त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती जास्त आहेत. आता अर्थसंकल्पात टॅक्सेस कमी केल्यास आपल्याकडेही पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होतील असे विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

सामनाला गंभीरतेने घेत नाही. सामनातून त्यांच्याच बाजू मांडल्या जातात त्यामुळे सामनाला गंभीरतेने घेत नाही. अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले हे सामनातून नाही छापून आले. सामना केवळ त्यांचीच भूमिका मांडत असते असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.


- Advertisement -

हेही वाचा : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार


कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. अव्वाच्या सव्वा बिले बनवण्यात आली असल्याचे पहिलेही जाहीर केले आहे. आरोग्य व्यवस्थेची विरोधी पक्षाने पुराव्यासह चिरफाड केली होती. आरोग्य सेवकांची भर्ती असताना पेपर फुटतात तर आरोग्य व्यवस्थेला काय निर्दोष देणार ती सदोष असणारच. कोविन अॅप त्रुटी आणि गोंधळावर बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारमध्ये गोंधळ आहे. सरकारमध्ये गोंधळ असल्याने प्रशासनातही गोंधळ उडणे स्वाभाविकच आहे. लसीकरणावेळी काही ठीकाणी सॉफ्टवेअरमध्ये अडचणी आल्या, भाषेच्या बाबतीत अडचणी आल्या तर पुरेसे कर्मचारीही उपस्थित नव्हते. या गोंधळामुळे ज्येष्ठ नागरिक सकाळपासून दुपारपर्यंत उभे राहत असतील तर ते सरकारला शोभा देणारं नाही असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

सरकारच्या मानसिकतेवर हल्ला

- Advertisement -

राज्य सरकारच्या मानसिकतेवरच हल्ला झाला आहे. राज्य सरकारवर आले की ते केंद्वार ढकलण्याचा प्रयत्न करतात. सायबर हल्ल्याचा आणि वीजेचा काहीही संबंध नाही त्यामुळे हा हल्ला त्यांच्या मानसिकतेवरच झाला असल्याचे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही. भाजपाने केलेल्या सततच्या मागणीमुळे संजय राठोडचा राजीनामा घेतला आहे. पंकजा मुंडेची मागणी योग्या आहे. ज्या प्रमाणे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याच नैतिकतेवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्यावा. सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर महाराष्ट्रातील जनता त्यांचे स्वागत करतील असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -