घरताज्या घडामोडीMaharashtra Budget Session Live Updates: विधानपरिषदेच कामकाज सुरू

Maharashtra Budget Session Live Updates: विधानपरिषदेच कामकाज सुरू

Subscribe

विधानपरिषदेच कामकाज सुरू झालं आहे.


मंत्री उपस्थित नसल्याने विधानपरिषद १० मिनिटं तहकूब

- Advertisement -

विधानपरिषदेच कामकाज २.३० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.


भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना १० कोटींची खटणी मागणारे पत्र, फडवणवीसांनी मुख्यमंत्र्यांना याप्रकरणात लक्ष्य घालण्याची केली विनंती.

- Advertisement -

विधानपरिषद २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली आहे. वीजबिल दरवाढीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान झाले.


वीज बिलाच्या मुद्द्यावरून जोवर अधिवेशनात चर्चा होत नाही तोवर घरगुती कृषी ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही – अजित पवार


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या कामकाजाला आज सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी वीज बिलाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहे.


विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्या अडचणी आखणीन भर पडण्याची शक्यता आहे. कारण मुंबै बँकचा सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. नाबार्डच्या २०१८-१९च्या अहवालामध्ये बँकेच्या कामकाजावरती ताशेरे ओढण्यात आले आहेत.


अर्थसंकल्पीय अधिवेशन

विधानसभेच अस होणार कामकाज

१. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांचा सन २०१९-२० या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येणार
२. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांचा २०१७-१८ या वर्षाचा छपन्नावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येणार
३. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे विकास महामंडळ मुंबई यांचा सन २०१९-२० या वर्षाचा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येणार
४. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचा सन २०१६-१७ व २०१८-१९ या वर्षांचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येणार
५. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल २०१३-१४ सभागृहासमोर ठेवण्यात येईल
६. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र व राज्य रोजगार हमी योजना या योजनांचा सन २०१९-२० या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येईल

शासकीय विधेयके

१ महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक २०२१
२. महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियामाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) विधेयक


राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज वीज बील, मेट्रो कारशेड अशा मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच आज अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर सुद्धा चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी, विरोधक सामना पुन्हा रंगणार आहे. विदर्भ, मराठवाडा वैधानिक विकास महांडळाच्या मुद्दा देखील आजही गाजण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -