घरताज्या घडामोडीMaharashtra Budget Session Live Updates: आजची विधानपरिषद बैठक स्थगित करण्यात आली आहे

Maharashtra Budget Session Live Updates: आजची विधानपरिषद बैठक स्थगित करण्यात आली आहे

Subscribe

आजची विधानपरिषद बैठक स्थगित करण्यात आली आहे.


देवेंद्र फडणवीसांच्या ‘भ्रष्टाचाराचा कोविड’ या पुस्तकाने प्रकाशन

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचं भाषण महाराष्ट्राची निराशा करणारं – मुख्यमंत्री


औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करुन दाखवा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

- Advertisement -

चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण यातलं अंतर मुख्यमंत्र्यांना कळलेलं नाही. कुठलाही शब्द ठाकरेंना दिला नव्हता,खोटं बोल पण रेडून बोल अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका – देवेंद्र फडणवीस


मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर बोललेच नाहीत. शेतकऱ्यांच्या संदर्भात एकही मुद्दा ते मांडू शकले नाहीत – फडणवीस


मेट्रो प्रकल्पावर एकत्र बसून मार्ग काढू – मुख्यमंत्री


विनाकारण महाराष्ट्राची बदनामी करु नका – मुख्यमंत्री


माझी थट्टा करा पण जनतेच्या जीवाची करु नका – मुख्यमंत्री


कोरोना सत्ताधारी की विरोधक ओळखत नाही – मुख्यमंत्री


विधानपरिषदेचं कामकाज पुन्हा सुरू


विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराचा तास संपला


समता परिषदेतील घोटाळ्यांमधील अधिकाऱ्यांच्या नावाची यादी पटलावर ठेवा आणि आज ५ वाजेपर्यंत निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली.


विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.


विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करत आहेत.  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असे भाजप नेते घोषणाबाजी करत आहेत. तसेच शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा मिळालाच पाहिजे असं फलक घेऊन भाजप नेते सरकार विरोधात निषेध करत आहेत.


राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज विधानपरिषद आणि विधानभवनातील कामकाज काय असणार आहे ते जाणून घ्या.

विभानपरिषदेतील आजचे कामकाज


विधानसभेतील आजचे कामकाज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -