Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रCash for Vote : तावडे प्रकरणावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला; कोणी...

Cash for Vote : तावडे प्रकरणावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला; कोणी टेम्पोने पाच कोटी पाठवले?

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणणारी घटना घडली आहे. उद्या (20 नोव्हेंबर) महाराष्ट्र विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी विरारमध्ये भारतीय जनता पक्ष आणि बहुजन विकास आघाडीमध्ये मोठा राडा झाला. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हॉटेल विवांता येथे पाच कोटी रुपये घेऊन आले आहेत. ते येथे पैसे वाटप करत असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना मिळाली. हितेंद्र ठाकुरांच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये तावडेंना पकडून ठेवले. हॉटेलमधून दहा लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली. त्यासोबतच काही डायऱ्याही सापडल्या. त्यामध्ये कोणाला किती रुपये दिले याचा तपशील असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. भाजपचे केंद्रीय नेते स्वतः पैसे वाटप करत असल्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तावडे प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. हे पाच कोटी रुपये कोणाच्या तिजोरीतून आले. हा पैसा तुम्हाल कोणी टेम्पोने पाठवला, असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

विनोद तावडेंवरुन राहुल गांधींचा मोदींना टोला

विनोद तावडे यांना एका हॉटेलात पैसे वाटताना पकडण्यात आले. ते भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. विनोद तावडेंना अडवल्याला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये काही लोक पैसे झळकवताना दिसत होते. यावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. तोच व्हिडिओ रिट्विट करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. त्यांनी म्हटले आहे की, “मोदी जी, हे पाच कोटी कोणाच्या तिजोरीतून निघाले? जनेताचा पैसा लुटून कोणी टेम्पो भरुन पाठवला?”

- Advertisement -

हा बालिशपणा…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना विनोद तावडे यांनीही सोशल मीडियावरुन प्रत्युत्तर दिले. तावडे म्हणाले, “राहुल गांधी जी, तुम्ही स्वतः नालासोपारा येथे या. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासा. निवडणूक आयोगाने केलेली कारवाई पाहा आणि अशा प्रकारे पैसा आला हे सिद्ध करा. कोणत्याही माहितीच्या आभावी अशा प्रकारचे वक्तव्य करणे हा बालिशपणा नाही तर काय आहे.” असे म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Vinod Tawde : विनोद तावडे प्रकरणावर भाजपची प्रतिक्रिया; बावनकुळे म्हणाले, विरोधकांनी एक फिल्म तयार केली…

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -