Maharashtra Assembly Election 2024
घरगणेशोत्सव २०२४इको फ्रेंडली गणेशElection 2024 : बच्चू कडू यांचा पाठिंबा कोणाला? म्हणाले, आम्ही वेगळ्या सरकारचे...

Election 2024 : बच्चू कडू यांचा पाठिंबा कोणाला? म्हणाले, आम्ही वेगळ्या सरकारचे स्वप्न पाहातोय

Subscribe

मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (23 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी की महायुती जनतेचा कौल कोणाला हे उद्या जाहीर होणार आहे. राज्याचा कारभारी कोण होणार याची सर्वांनाच उत्सूकता आहे. अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांना पूर्ण बहुमत मिळाले नाही तर छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर अपक्ष आणि छोट्या पक्षांना मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. निकालानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्येही गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे निकाल काय असणार याची उत्सूकता आहे. दोन्ही प्रमुख आघाड्यांना बहुमत मिळाले नाही तर मनसे, वंचित, परिवर्तन महाशक्ती, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, एमआयएम या छोट्या पक्षांशी संपर्क केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जे सत्तास्थापन करतील त्यांना पाठिंबा देऊ असे म्हटले आहे. तर विदर्भातीलच नेते बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला असणार याचा खुलासा केला आहे.

- Advertisement -

दोन्हीकडून आम्हाला संपर्क – बच्चू कडू

प्रहार संघटनेचे नेते आणि विधानसभा निवडणुकीआधी परिवर्तन महाशक्ती स्थापन करणारे बच्चू कडू यांनी दावा केला आहे की, महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांकडून आम्हाला संपर्क केला जात आहे. मात्र आमचे अजून काहीही ठरलेले नाही. एकदा कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ, असे कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू म्हणाले, “महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून आम्हाला संपर्क केला जात आहे. आम्ही अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. एकदा कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ. पण दोन्हीकडून फोन आलेले आहेत.”

- Advertisement -

आम्ही वेगळ्या सरकारचे स्वप्न पाहा आहोत – बच्चू कडू

बच्चू कडू यांनी प्रमुख दोन आघाड्यांशिवाय तिसरा पर्याय देखील समोर येऊ शकतो, असे म्हटले आहे. ते म्हणाले, “आम्ही वेगळ्या सरकारचे स्वप्न पाहात आहोत. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते जसा संपर्क करत आहेत, तसाच आम्ही देखील संपर्क करत आहोत. प्रहार पक्षाचे 4 ते 5 उमेदवार निवडून येतील. आम्ही जी तिसरी आघाडी केली त्यांना घेऊन आम्ही सरकार बनवणार आहोत. कोणाला पाठिंबा देण्याऐवजी आपल्या सरकारचं स्वप्न पाहणं महत्वाचं वाटतं, पाठींब्याची वेळ येणार नाही.” असंही कडू म्हणाले.

हेही वाचा : Vidhan Sabha Election 2024 : मुंबईत सागर बंगला भाजपच्या घडामोडींचे केंद्र; बाळा नांदगावकर फडणवीसांच्या भेटीला 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर बच्चू कडू यांनी सर्वात शेवटी महायुतीला पाठिंबा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता, असाही खुलासा त्यांनी केला होता. त्यामुळे बच्चू कडू काय करणार याची उत्सूकता लागून राहिली आहे.

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -