Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठवाडाElection 2024 Result : महायुतीचा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरणार; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा,...

Election 2024 Result : महायुतीचा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरणार; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा, जरांगेंबद्दल म्हणाले…

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या (23 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. त्याआधी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. या पदावरुन महायुतीत कोणताही वाद नाही. महायुतीचा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरेल असं भाजपच्या बड्या नेत्याने म्हटले आहे. तर दुसरीकडे महायुतीला पूर्ण बहुमत नाही मिळाले तर भारतीय जनता पक्षाकडून ‘प्लॅन बी’ची तयारी सुरु आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांना संपर्क करण्यासाठी एक टीमही देवेंद्र फडणवीसांनी तयार केल्याची महिती आहे. तर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या उमेदवारांसोबत ऑनलाईन बॅठकीद्वारे संवाद साधला. शेवटचे मत मोजले जात नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडायचे नाही, विजयाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर थेट मुंबई गाठायची असे आदेश शरद पवारांनी दिले आहेत. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचे बहुमताचेच सरकार येणार असा दावा केला आहे.

हेही वाचा : Election 2024 : बच्चू कडू यांचा पाठिंबा कोणाला? म्हणाले, आम्ही वेगळ्या सरकारचे स्वप्न पाहातोय

- Advertisement -

महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत…

पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज शिर्डीला येऊन साई बाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “सत्ता स्थापनेसाठी आम्हाला जागा कमी पडणार नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या 160 जागा निवडून येतील.” असा दावा त्यांनी केला. तसेच महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय दिल्लीत तिन्ही पक्षांच्या बैठकीत होईल. आमची पक्ष संघटना शिस्तीत चालते, कशातच फूट पडली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा दिल्लीतील नेत्यांवर विश्वास आहे, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही…

महायुती सरकारच्या काळात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांग यांच्या आंदोलनाने सरकारला घेरलेले होते. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची त्यांची मागणी होती. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचाही तयारी केली होती. जरांगे यांच्या निशाण्यावर भाजप आणि देवेंद्र फडणवीस राहात होते. आता पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले तर जरांगे यांना उपोषणाची गरज पडणार नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, “नवीन सरकार आल्यावर मनोज जरांगे यांच्यावर उपोषण करण्याची वेळ येणार नाही. नवीन सरकार ती परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही.” त्यामुळे नवीन सरकार समोर मराठा आरक्षणाचा विषय प्रामुख्याने असेल असे संकेत पाटील यांनी दिले आहेत.

हेही वाचा : Vidhan Sabha Election 2024 : मुंबईत सागर बंगला भाजपच्या घडामोडींचे केंद्र; बाळा नांदगावकर फडणवीसांच्या भेटीला 

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -