Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रBJP : महायुतीला अपक्षांची गरज लागणार नाही; रावसाहेब दानवेंचे बंडखोरांबद्दल मोठे वक्तव्य,...

BJP : महायुतीला अपक्षांची गरज लागणार नाही; रावसाहेब दानवेंचे बंडखोरांबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाले…

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचे, जिल्ह्याचे आणि मतदारसंघाचे गणित वेगळे राहिलेले आहे. ज्या प्रमाणे पाच मैलांवर भाषा बदलते तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात झालं आहे. कोणताच एक मुद्दा सर्वदूर चाललेला नाही. त्यामुळे उद्या (23 नोव्हेंबर) जाहीर होणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. निकाल कोणाच्या बाजूने असेल आणि निकालानंतर कोण कोणाच्या बाजूने असेल हे कोणही छातीठोकपणे सांगू शकत नाही अशी महाराष्ट्राची स्थिती आहे. असे असले तरी राजकीय नेते हे आमचाच पक्ष विजयी होणार आणि सत्तेत आम्हीच येणार असा दावा आज सकाळपासून करु लागले आहेत. मात्र अपक्षांच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नाही, असे राजकीय जाणकरांचे मत आहे.

भारतीय जनता पक्षाची आज तातडीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली. या बैठकीला भाजपचे नेते हजर होते. त्यासोबतच मनसेचे बाळा नांदगावकरही या बैठकीला उपस्थित होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. बैठकीला हजर असलेले भाजप नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आम्हाला राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल, त्यामुळे आम्हाला अपक्ष आमदारांची गरज लागणार नाही.”

- Advertisement -

महायुतीचे बहुमताने सरकार स्थापन होणार

रावसाहेब दानवे यांचा लोकसभेत पराभव झाला आहे. आता त्यांचे चिरंजीव भोकरदन मतदारसंघातून विधानसभेचे उमेदवार आहेत. तर त्यांची मुलगी संजना जाधव यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आणि धनुष्यबाण हाती घेतला आहे. मुलगा आणि मुलगी दोन्ही विधानसभेच्या रिंगणात उतरवलेले रावसाहेब दानवे म्हणाले, लोकसभेत काँग्रेसने जे नरेटिव्ह सेट केले होते, त्याचा आम्हाला फटका सहन करावा लागला. यावेळी मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. यावेळी वेगळी परिस्थीती होती. त्यामुळे महायुतीचे सरकार बनणार आहे. बहुमताने आमचे सरकार स्थापन होईल. आम्हाला अपक्षांची किंवा इतर पक्षांची गरज पडणार नाही,असा दावा दानवेंनी केला.

हेही वाचा : Vidhan Sabha Election 2024 : मुंबईत सागर बंगला भाजपच्या घडामोडींचे केंद्र; बाळा नांदगावकर फडणवीसांच्या भेटीला 

- Advertisement -

“बंडखोरांशी बोलण्याची गरज पडणार नाही”

महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. अनेक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती झाल्या. दानवे पराभूत झाले त्या जालना लोकसभा मतदारसंघात त्यांचा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यासोबत निवडणूक काळात कलगीतुरा रंगला होता. सत्तारांच्या विरोधात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर यांनी पक्षाचा राजीनामा देऊन ठाकरेंच्या सेनेते प्रवेश केला आणि सत्तारांचे प्रतिस्पर्धी उमेदवार झाले. बंडखोरांबद्दल दानवे म्हणाले की, “आम्ही बहुमतात येत असल्यानं बंडखोरांशी चर्चा करण्याची गरज नाही. बंडखोर हा विषय सत्ता स्थापन झाल्यानंतरचा आहे. बंडखोर अपक्ष असेल आणि त्याला जर महायुतीला पाठिंबा द्यायचा असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करु.”

हेही वाचा : Election 2024 Result : महायुतीचा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरणार; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा, जरांगेंबद्दल म्हणाले…

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -