Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रCongress : मी सत्तेतला आमदार असणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा;...

Congress : मी सत्तेतला आमदार असणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा; आघाडीचा आकडाही सांगितला

Subscribe

नागपूर – मी सत्तेतला आमदार असेल, अशी खात्री नाही तर विश्वास आहे. उद्या रात्री महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार, आम्हाला 160-165 जागा मिळतील, असा दावा महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर विमानतळावर केला. एक्झिट पोल काही आले तरी, महाविकास आघाडी जिंकत आहे. मी सत्तेतला आमदार असणार असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी निकालाच्या काही तास आधी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास उरले आहेत. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. काँग्रेस-महाविकास आघाडी उद्या रात्री सत्ता स्थापनेचा दावा करणार असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री पदाबाबत ते म्हणाले की, “काँग्रेसला मुख्यमंत्रीपद भेटावं ही काँग्रेसजणांची इच्छा आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेनेला (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री पद मिळावे ही त्यांची इच्छा आहे. पण आम्ही तिघेही एकत्र येऊन जो निर्णय होईल, तो अंतिम असेल,” असंही ते म्हणाले.

- Advertisement -

मतोजणीसाठी सतर्क राहण्याच्या सूचना

केंद्रात भाजप प्रणित एनडीएचे सरकार आहे आणि राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून भाजप प्रणित महायुतीचे सरकार आहे. विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पैशांचे वाटप आणि बोगस मतदानाच्या तक्रारी झाल्या मात्र, आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली नाही असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे मतमोजणीला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे असे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आदेश दिले आहे. वडेट्टीवार म्हणाले, आमच्या सगळ्या लोकांना उद्याच्या मतोजणीसाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काय काय काळजी घेतली पाहिजे, तसेच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडायचे नाही, या सुद्धा सूचना करण्यात आल्या आहेत
उद्या (23 नोव्हेंबर) 12-1 वाजता चित्र स्पष्ट होईल आणि महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली दिसेल, असाही दावा त्यांनी केला.

विजय वडेट्टीवार दोन वेळा विरोधी पक्षनेते राहिले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. सत्ता आल्यानंतर वडेट्टीवार यांना प्रमोशन मिळणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम राहिल. दोनदा विरोधी पक्षनेता पद मी महाराष्ट्रात सांभाळले आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला, मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे. ती मी प्रामाणिकपणे समर्थपणे ती पार पाडली आहे. उद्या सत्ता येणार आणि सत्तेमध्ये मी असणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

विदर्भातील आमदारांची जबाबदारी वडेट्टीवारांवर

विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या विजयी आमदारांना मुंबईला घेऊन जाण्याची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याबद्दल वडेट्टीवार म्हणाले की, बारा तासाच्या आत मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही घोषित करू. विदर्भातील विजयी आमदारांना घेऊन जाण्याची जबाबदारी हायकमांडने सोपवलेली आहे
उद्या काय-काय करायचे याचे मार्गदर्शन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आम्हाला वारंवार करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
परवा सत्ता स्थापनेचा मंडप दिसेल, आणि 12 तासात महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार असाही दावा त्यांनी केला आहे.

बंडखोरांबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील

महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार जुंपली आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले की, जेवढे काँग्रेस विचारसरणीची मंडळी आहेत, ते आमचेच आहेत. ज्यांनी बंडखोरी केली असेल किंवा अपक्ष असतील त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्यात आहे. त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठींनी चर्चा सुरू केली असावी. त्यांच्या बद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एकत्र बसून घेऊ

काँग्रेसला मुख्यमंत्रीपद भेटावं ही काँग्रेसजणांची इच्छा आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावे ही त्यांची इच्छा आहे, पण तीनही पक्षांचे नेते एकत्र येऊन जो निर्णय एकमताने होईल, तो अंतिम असेल, असं वडेट्टीवार म्हणाले. कुटुंब प्रमुख एकच असतो आणि कुटुंबात जेव्हा तीन घरं असतात तेव्हा एक कुटुंब प्रमुख सर्वानुमते ठरवू असं ते म्हणाले.

हेही वाचा : Election 2024 : बच्चू कडू यांचा पाठिंबा कोणाला? म्हणाले, आम्ही वेगळ्या सरकारचे स्वप्न पाहातोय

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -