Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीShiv Sena Vs Shiv Sena : मंत्री सत्तारांची उद्धव ठाकरेंना तुरुंगात टाकण्याची...

Shiv Sena Vs Shiv Sena : मंत्री सत्तारांची उद्धव ठाकरेंना तुरुंगात टाकण्याची भाषा; अंबादास दानवेंनी असे दिले प्रत्युत्तर…

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – मंत्री अब्दुल सत्तार यांचा पराभव निश्चित दिसत असल्याने पराभावाच्या धास्तीने ते मतदारसंघात पैसे वाटण्याची दाट शक्यता असल्याचा दावा शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ घाटनांद्रा येथे सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित सभेत ते बोलत होते. 23 नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीनंतर अब्दुल सत्तार यांच्या हुकुमशाहीचा अंत झालेला आपल्याला दिसेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कारागृहात टाकण्याची भाषा करणाऱ्या गद्दार आमदाराला आपल्याला धडा शिकवायचा आहे. शिवसैनिकांसाठी पक्षप्रमुखाचा स्वाभिमान आणि अभिमान सर्वप्रथम असून आपल्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या या गद्दार आमदाराचा पराभव करुन आपल्याला बदला घेण्याचा असल्याचे, जाहीर आवाहन दानवे यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.

- Advertisement -

महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अब्दुल सत्तार यांनी विरोध केला. घाटनांद्रा सारख्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा अब्दुल सत्तार यांनी बसवू दिला नाही, ही अत्यंत शरमेची बाब आहे. हिंदुत्वाची गर्जना करणाऱ्या अब्दुल सत्तारांच्या मनात छत्रपती शिवरायांविषयी आकस असून मराठी माणसाचा अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या या गद्दार गटाच्या आमदाराला विधानसभा सभागृहाची यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पायरी चढू देऊ नका, असे जाहिर विनंती वजा आवाहन अंबादास दानवे यांनी मतदार बंधू-भगिनींना केले.

- Advertisement -

मतदारसंघ जहागिरी नाही… 

पंधरा वर्षांपूर्वी सिल्लोड – सोयगांव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे आश्वासन देऊन अब्दुल सत्तार आमदार झाले. मात्र, विकास तर दूर राहिला जनतेला त्रास देण्याचे कार्य त्यांनी केले. सिल्लोड शहरातील तसेच तालुक्यातील इतर ठिकाणच्या जमिनी बळकवण्याचे अधिकृत धंदे त्यांनी आपल्या आमदार पदाच्या कार्यकाळात केले. मतदार संघाला आपली जहागिरी समजणाऱ्या या हुकूमशाही प्रवृत्तीच्या आमदाराला आपल्याला पराभूत करायचे, असल्याचे मत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार सुरेश बनकर यांनी प्रकट केले.

हेही वाचा : Uddhav Thackeray : केलंय काम भारी, लुटली तिजोरी, केली गद्दारी; कर्जतमध्ये भर उन्हात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -