छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आज जाहीर होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मराठवाड्याकडे लागून राहिले आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा आहेत. लोकसभेत मराठवाड्यात महायुतीचा सुपडासाफ झाला होता. त्यामुळे आता विधानसभेत काय होणार याची उत्सूकता आहे. मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. त्यासोबतच ओबीसी फॅक्टरही महत्त्वाचा आहे. शेती, जात यांचा निवडणुकीवर काय परिणाम होतो ते काही तासांत समजणार आहे.
Marathwada Result 2024 Live Update
- देगलूर (नांदेड)
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जितेश अंतापूरकर तीन फेऱ्या अखेर 6198 मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे निवृत्ती कांबळे पिछाडीवर - भोकर (नांदेड)
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण आघाडीवर. दुसऱ्या फेरीनंतर 5591 मतांनी आघाडी - उदगीर (लातूर)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) संजय बनसोडे आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव हे 16,193 मतांनी पिछाडीवर. - जिंतूर (परभणी)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विजय भांबळे पहिल्या फेरीत 341 मतांनी आघाडीवर. भाजपच्या मेघना बोर्डीकर पिछाडीवर - कन्नडमध्ये पती-पत्नीची लढाई
शिवसेना (शिंदे) रंजनाताई (संजना) जाधव पहिल्या फेरीत आघाडीवर. अपक्ष हर्षवर्धन जाधव पिछाडीवर. विद्यमान आमदार ठाकरेंचे निष्ठावान उदयसिंह राजपूत तिसऱ्या क्रमांकवर - बदनापूर (एससी)
भारतीय जनता पक्षाचे नारायण कुचे पहिल्या फेरीत 3663 मतांनी आघाडीवर. शरद पवार गटाचे बबलू चौधरी पिछाडीवर आहे. - वैजापूर
शिवसेना शिंदे गटाचे रमेश बोरनारे पहिल्या फेरीत 1530 मतांनी आघाडीवर. शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश परदेशी यांना पहिल्या फेरीत 3544 तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे बंडखोर एकनाथ जाधव यांना 427 मते. - बालेकिल्ल्यात शिवसेनेला धक्का
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट पिछाडीवर. शिवसेना ठाकरे गटाचे राजू शिंदे पहिल्या फेरीत 519 मतांनी आघाडीवर - बीड जिल्ह्यातील केज विधानसभा (एससी) मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांच्यात लढत होत आहे. पहिल्या फेरीअखेर साठे 248 मतांनी आघाडीवर
- विजयी मिरवणुकीवर बंदी
सुरुवातीला पोस्टल बॅलेटपेपरची मतमोजणी सुरु झाली. त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणी करण्यात येत आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मायक्रो निरीक्षक देखील आहेत, ते केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी 23 नोव्हेंबर रोजी विजयी मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली - बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोद्यातून महायुतीचे उमेदवार सुरेश धस आघाडीवर. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब शेख पिछाडीवर.
- छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचनेनुसार मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना साडेआठ नंतर प्रवेश.
सकाळी 8 वा. पोस्टल मतमोजणी प्रक्रिया सुरु. - शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शायरीतून सत्ताधाऱ्यांवर टिप्पणी केली आहे.
-
हर सितम का जवाब आएगा,
देखना इंकलाब आएगा,
अच्छे दिन का जो किए थे वादा,
उनका दिन भी खराब आएगा..#ElectionResults#MaharashtraElection2024— Ambadas Danve (@iambadasdanve) November 23, 2024
- Advertisement -
Edited by – Unmesh Khandale