Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रAmbadas Danve on Congress : कॉंग्रेसचा अतिआत्मविश्वास आम्हाला नडला; काय म्हणाले दानवे

Ambadas Danve on Congress : कॉंग्रेसचा अतिआत्मविश्वास आम्हाला नडला; काय म्हणाले दानवे

Subscribe

विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी यश मिळाले तर मविआ भुईसपाट झाली. यानंतर आता महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होताना दिसते आहे. ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी या पराभवाचे खापर कॉंग्रेसवर फोडले आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आणि सध्या राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. या निवडणुकीत महायुतीला विक्रमी यश मिळाले तर मविआ भुईसपाट झाली. यानंतर आता महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होताना दिसते आहे. ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी या पराभवाचे खापर कॉंग्रेसवर फोडले आहे. (maharashtra assembly election result 2024 shiv sena ubt blames congress for defeat in maharashtra)

कॉंग्रेसवर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले की, कॉंग्रेसचा अति आत्मविश्वास आम्हाला नडला. निकाल लागायच्या आधीच कॉंग्रेसचे नेते जिंकल्याच्या आविर्भावात वावरत असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, शिवसेना – ठाकरे गट आपली ताकद वाढवत असून राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागा स्वबळावर लढण्याची तयारी करेल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray group & MVA : ठाकरे गट मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊत स्पष्टच म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर इंडि आघाडीच्या नेत्याने कॉंग्रेसच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. शिवसेना – ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेता अंबादास दानवे म्हणाले की, कॉंग्रेसचा अति आत्मविश्वास, तसेच जागावाटपांच्या चर्चेदरम्यान त्यांच्या आडमुठेपणामुळे मविआच्या विजयाच्या शक्यतांवर पाणी फेरले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता दानवे म्हणाले की, निवडणुकांच्या आधी महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करायला हवे होते. तसे झाले असते तर, निकाल वेगळे लागले असते, असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर कॉंग्रेसला ज्याप्रमाणे हरयाणा आणि जम्मू – काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीबाबत अति आत्मविश्वास होता, तोच महाराष्ट्राबाबतही होता. आणि त्याचाच परिणाम निकालात दिसला. कॉंग्रेसच्या हाच आडमुठेपणा आम्हाला भोवल्याचेही ते म्हणाले.

महायुतीचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्याबाबत दानवे म्हणाले की, भाजपात बरेच शिंदे आहेत. भाजप अशांचा वापर करते आणि मग त्यांना फेकून देते.

हेही वाचा – Politics : नाना पटोलेंचे निवडणूक आयोगावर आरोप; धनंजय मुंडे म्हणतात, विरोधकांचा भाबडेपणा…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे अनेक अर्थाने महत्त्वाचे आहेत. या निवडणुकीत महायुतीने विक्रमी विजय मिळवला तर विरोधात असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार आणि शिवसेना – ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीला अत्यंत वाईट पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते हरल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. (maharashtra assembly election result 2024 shiv sena ubt blames congress for defeat in maharashtra)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -