मुंबई : विधानसभा निकालाचा आजचा मोठा दिवस आहे. अजूनही केवळ कलच हाती येत आहेत, असे असताना आता मुख्यमंत्री म्हणून ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले आहेत. (maharashtra assembly election results 2024 uddhav thackeray and eknath shinde as cms posters put up in mumbai thane)
राज्यातील विधानसभेच्या 288 जागांचा निकाल आज लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा प्रणित महायुती आघाडीवर आहे.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : महायुतीच्या वादळात मविआ भुईसपाट, सुरुवातीचा कल काय सांगतो?
शिवसेना ठाकरे गट घटक पक्ष असलेल्या मविआचे कलांमध्ये तरी प्रदर्शन चांगले दिसत नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर ‘परिवाराचा प्रमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार’ असा मजकूर आहे. तर दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील पोस्टर्स समोर येत आहेत. त्यावर ‘पुन्हा एकदा शिंदे सरकार’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
मविआ – महायुती आमने – सामने
विधानसभेचे निकाल लागण्यापूर्वीच पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, याची चर्चा सुरू होती. अनेकांनी दावे केले होते. आणि यात विरोधक देखील मागे नव्हते. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्वांनीच महायुतीच्या बाजूने कौल दिला होता.
हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान वाढले…ठरणार निर्णायक ?
राज्यात 288 मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एकूण 65.11 टक्के मतदान झाले. 2019 च्या तुलनेत हे मतदान चार टक्क्यांनी जास्त आहे. 288 विधानसभा जागांवर सर्व पक्ष मिळून 4,136 उमेदवार मैदानात आहेत. यात 2,086 उमेदवार अपक्ष आहेत. 150 हून जास्त बंडखोर उमेदवार आहेत. यात महायुती आणि मविआचे उमेदवार आपल्याच पक्षातील उमेदवारांविरोधात लढत आहेत. (maharashtra assembly election results 2024 uddhav thackeray and eknath shinde as cms posters put up in mumbai thane)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar