घरमहाराष्ट्रनिवडणुकांमुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले

निवडणुकांमुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले

Subscribe

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक देखील कोलमडले असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे. तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय कार्यालयाबरोबरच आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील ही लगबग पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वीच निवडणूक होणार असून त्याचा निकाल देखील दोन दिवसात लागणार आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना याचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. शाळा आणि महाविद्यालयांना येत्या १९ ऑक्टोबरपूर्वी परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे लांबलेले प्रवेश आणि आता पहिल्या सत्राच्या लांबणाऱ्या परिक्षा यामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्षांचे नियोजन कोलमडल्याच्या प्रतिक्रिया शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त केल्या जात आहेत.

परिक्षांचे वेळापत्रक कोलडले

लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या. त्यामुळे महाविद्यालयाचे प्रवेश लांबणीवर गेले होते. तर आता विधानसभा निवडणुकीमुळे शैक्षणिक वर्षांचे पहिल्या सत्राचे नियोजन देखील कोलमडले आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे शाळांचे नियोजन होते. मात्र, आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर २४ ऑक्टोबरला निकाल आणि नंतर २५ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. त्यामुळे शाळांना १९ ऑक्टोबरपूर्वी परीक्षा संपवाव्या लागणार आहेत.

- Advertisement -

निवडणुकांच्या आधी परीक्षा घेणे कठीण

आताच्या सत्रात झालेल्या सुट्ट्या, लांबलेली प्रवेश प्रक्रिया यामुळे मुळात अध्यापनासाठी शाळा, महाविद्यालयांना कमी दिवस मिळाले आहेत. त्यामुळे १९ ऑक्टोबर पूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून प्रात्यक्षिक परीक्षा, लेखी परीक्षा पूर्ण करणे शाळांना शक्य नाही. त्यातच विधानसभा निवडणुकांचे काम आणि प्रशिक्षणे यामुळे शाळांमध्ये कमी शिक्षक उपस्थित आहेत. त्यामुळे आता निवडणुकांच्या आधी परिक्षा घेणे शक्य नसल्याचे मुख्यध्यापकांनी सांगितले आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या काही परीक्षाही १ ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षा ही घेण्याचे नियोजन देखील ऑक्टोबरमध्ये करण्यात आले होते. मात्र, आता त्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागणार असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले आहे.

याचा पुढील सत्रावर परिणाम

जर निवजणुकीनंतर म्हणजेच दिवाळीनंतर पहिल्या सत्राची परीक्षा घेण्यात आली तर त्याचे निकाल देखील जाहीर होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे याचा परिणाम पुढील सत्रावर होणार आहे. मात्र, असे असले तरी पुढील शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक, विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक यामुळे पुढील सत्राच्या परीक्षा मात्र, नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे पुढील सत्रातही अध्यापनासाठी दीड ते दोन महिनेच मिळणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जेईई, नीटच्या धर्तीवर एमएच सीईटी परीक्षा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -