घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दाढीवाले मुख्यमंत्री; भुजबळांचा दाढीवरून पंतप्रधान मोदींना टोला

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दाढीवाले मुख्यमंत्री; भुजबळांचा दाढीवरून पंतप्रधान मोदींना टोला

Subscribe

विधानसभेत जीएसटीच्या मुद्द्यावरून बोलताना राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून पंतप्रधान मोदी यांना टोला लागवला आहे. अधिवेशनात जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्न यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान जीएसटीच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरूनही टोलेबाजी केली आहे. ज्यावरून सभागृहात एकचं हशा पिकला.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे हात दाखवत छगन भुजबळ म्हणाले की, तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचे पाहून मला आनंद झाला, पण मला आनंद होण्यामागे कारण वेगळेच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की, दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यामध्येही सफेद दाढी, काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे, सफेद दाढीचा प्रभाव दिल्लीपासून संपुर्ण हिंदुस्तानावर आहे. अशा शब्दात भुजबळांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. भुजबळांच्या या विधानाने सभागृहात उपस्थितांमध्ये एकचं हशा पिकला.

- Advertisement -

‘स्कुल चले हम जीएसटी के साथ’ 

यावेळी भुजबळांनी जीएसटीवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तिकडून हे जा काय सुरु आहे. सरकारने जीएसटीत चांगली वाढ झाली आहे. संकलन वाढलं आहे. जीएसटी परिषदेत सगळ्या राज्यांचे लोक असतात मानतो, पण गेल्या काही दिवसांत बातम्या आल्या की अनेक अन्नधान्याच्या आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला, याचा फटका शेवट्या माणसाला बसतोय. यामुळे जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट सुरु आहे. एक गोष्ट जीएसटीतून सुटलेली नाही. नशीब आमच्या भाषणावर जीएसटी लावला नाही. सर्व सामान्यांवर फार वाईट परिणाम होत आहे. अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच स्कुल चले हम जीएसटी के साथ अशा घोषणा लोक देत आहे, म्हणत केंद्राच्या योजनेवर टीकास्त्र डागले.


अजित पवारांच्या पहिल्याच प्रश्नाने सरकारची दांडी गुल, आरोग्यमंत्र्यांनी उत्तरासाठी मागितली वेळ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -