घरमहाराष्ट्र'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी', विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची पोस्टरबाजी

‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी’, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची पोस्टरबाजी

Subscribe

विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनानचा आज दुसरा दिवस आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या  दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी मराठवाड्यातील अतिवृष्टी, ईडी कारवाया आणि एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडखोरीवर घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आहे. विधानभवानाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आजही सरकारविरोधात घोषणाबाजी करत पोस्टरबाजी केली. गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहटी, चलो गुवाहटी, असे पोस्टर विरोधकांनी झळकावले. विधानभवनातील पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन करत घेरण्याचा प्रयत्न केला. तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देत लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधी पक्षाच्यावतीने आजही विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला धारेवर धरण्यात आले.

५० खोके एकदम ओक्के, ईडी सरकार हाय हाय, ईडी सरकारचा निषेध असो, स्थगिती सरकार हाय हाय, खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो…,  ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…, फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… नही चलेगी… नही चलेगी दादागिरी नही चलेगी… सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है…फिफ्टी- फिफ्टी… अशी घोषणाबाजी आजही विरोधकांनी केल्या. यावेळी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्यासह नितीन राऊत, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, प्रणिती शिंदे, नाना पटोले, छगन भुजबळ यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी दिसले. दरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून विरोधकांनी घोषणाबाजी देत लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

५० खोके… एकदम ओके… ईडी सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… बेकायदा सरकार हाय हाय…अशा घोषणांनी विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला अक्षरशः हैराण करून सोडले. शिवसेनेत बंडखोरी करून जे आमदार गेले ते विधानभवनात ज्यावेळी येत होते त्यावेळी आले रे आले गद्दार आले… ५० खोके एकदम ओके… अशा जोरदार घोषणा आक्रमकपणे दिल्या जात होत्या.


पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; ‘या’ मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -