घरताज्या घडामोडीराज्यात धर्मांतराचे रॅकेट, 'रेट कार्ड'द्वारे तरुणांना आर्थिक बळ; नितेश राणेंचा विधानसभेत आरोप

राज्यात धर्मांतराचे रॅकेट, ‘रेट कार्ड’द्वारे तरुणांना आर्थिक बळ; नितेश राणेंचा विधानसभेत आरोप

Subscribe

अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवले जाते. मुलीवर अत्याचार करत चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो', असे गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केले. तसेच, 'हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिले जाते.

‘अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवले जाते. मुलीवर अत्याचार करत चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो’, असे गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केले. तसेच, ‘हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिले जाते. यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आले आहे’, असेही आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित नितेश राणे यांनी केला. त्यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करत आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. (Maharashtra Assembly Monsoon Session Bjp Mla Nitesh Rane Religious Conversion Ahmednagar)

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पहिल्या चार दिवसांत अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी सभागृहात लक्षवेधी बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी आरोप केले. “अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवले जाते. मुलीवर अत्याचार करत चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच आरोपीला पकडले जात नाही. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला स्थानिक जेलमध्ये बंद केलं आहे. सेंट्रल जेलमध्ये पाठवलेले नाही. महाराष्ट्रासाठी हा फार गंभीर प्रश्न आहे”, असे नितेश राणे यांनी म्हटले.

- Advertisement -

“सानप नावाच्या अधिकाऱ्याचे आरोपीसोबत आर्थिक व्यवहाराची चर्चा आहे. आरोपीला घरचे जेवण दिले जाते. इतर मदत करण्यात येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना फसवले जाते. त्यासाठी त्यांना ताकद दिली जाते. हिंदू मुलींचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी पैसे दिले जातात, बाईक दिली जाते. धर्मपरिवर्तनाला बळ देण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. रेट कार्ड करण्यात आले आहे”, असेही नितेश राणे यांनी म्हटले.

शीख तरुणीला फसवले तर सात लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवले तर सहा लाख, गुजरातील ब्राह्मण तरुणीसाठी सहा लाख, ब्राह्मण तरुणीसाठी पाच लाख, क्षयित्र तरुणीसाठी चार लाख असे रेट कार्ड तयार करण्यात आल्याचे नितेश राणे यांनी निदर्शनास आणून दिले.

- Advertisement -

भाजपा आमदार नितेश राणे यांच्या या आरोपांवर आणि कारवाई करण्याच्या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करत आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, “नितेश राणेंनी मांडलेला विषय फार गंभीर आहे. पीडिता अल्पवयीन असताना तीन वर्ष आरोपी इमरान युसूफ कुरेशी याने अत्याचार केले. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही पोलीस अधिकारी सानप यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“लगेच बडतर्फ करता येणार नाही, त्यासाठी प्रक्रिया असते. पण यांना केलेला गुन्हा आणि वागणूक यासाठी कडक शिक्षा केली जाईल. त्यांचे आरोपींसोबत संबंध असल्याचं निष्पन्न झालं तर त्यांच्यावरही गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्यासंदर्भात कारवाई केली जाईल. आरोपीवर मोठ्या प्रमाणात गुन्हे असून, याची माहिती घेऊन विशेष कायद्यांतर्गतही कारवाई करता येईल का हे तपासले जाईल. धर्मांतरणाचा कायदा आपल्याकडे आधीच अस्तित्वात आहे. कायद्यामध्ये तरतुदी आहेत. आमिष देऊन, जबरदस्तीने कोणीही धर्मांतरण करु शकत नाही. जर कायद्यामधील तरतुदींमध्ये त्रुटी असल्या, तर त्या अधिक कठोर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


हेही वाचा – दोन ते अडीच वर्षात नवी मुंबईत अवैध धंदे वाढले; भाजपाच्या मंदा म्हात्रे यांचा गंभीर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -