घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांच्या आत्महत्येची ईडी सरकारला लाज नाही; नाना पटोलेंचा घणाघात

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ईडी सरकारला लाज नाही; नाना पटोलेंचा घणाघात

Subscribe

हे सरकार वन वे पद्धतीने महाराष्ट्राचा विकास करण्यास निघाले आहे. सरकारचे दुटप्पी धोरण यातून समोर येत आहे. असा आरोपही नाना पटोलेंनी केला आहे

विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसीही 50 खोके…एकदम ओक्के अशा घोषणा देत गाजवला आहे. यात दुसऱ्या दिवशीही ‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी’ घोषणाबाजी करून शिंदे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल करण्यात आला. दरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टीवरूनही सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला. यावेळी अतिवृष्टी झालेल्या भागात लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली. शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. राज्यातील किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांना पाहिजे? यानंतर सरकार बोलणार का अशी स्थिती आहे. महाराष्ट्रातील किती सरकार आत्महत्या करतात मात्र त्याची लाज ईडी सरकारला नाही. असे चित्र आहे. अशा शब्दात नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे. विधानभवन पायऱ्यांवरील आंदोलनादरम्यान नाना पटोले बोलत होते.

‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी’, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची पोस्टरबाजी

नाना पटोले म्हणाले की, हे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे नाही, केंद्रात सत्तेत बसलेल्या सरकारच्या इशाऱ्यावर गुजरातच्या फायद्यासाठी हे काम करत असल्याचे दिसून येत आहे. मदत देण्याची इच्छा नाही, राज्यातील किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांना पाहिजे? यानंतर सरकार बोलणार का अशी स्थिती आहे. महाराष्ट्रातील किती सरकार आत्महत्या करतात मात्र त्याची लाज ईडी सरकारला नाही. असे चित्र आहे. यासंदर्भात आज चर्चा होणार आहे. आणि सरकारला आजचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

- Advertisement -

काल 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या राज्य सरकारने ठेवल्या, यात शेतकऱ्यांसाठी कुठलीही व्यवस्था केलेली नाही, यावरून महाराष्ट्रातील ईडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यात राज्याच्या प्रत्येक भागाच्या विकासाचे प्लॅनिंग करायला पाहिजे होते, तेही केले नाही. हे सरकार वन वे पद्धतीने महाराष्ट्राचा विकास करण्यास निघाले आहे. सरकारचे दुटप्पी धोरण यातून समोर येत आहे. असा आरोपही नाना पटोलेंनी केला आहे.


…तर 11 तारखेला माझं पण जय श्रीराम झालं असतं : मनीषा चौधरी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -