Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रPriyanka Gandhi : सरकार पाडण्यासाठीच्या बैठकीत उद्योगपती अदानींचे काय काम, प्रियंका गांधीचा...

Priyanka Gandhi : सरकार पाडण्यासाठीच्या बैठकीत उद्योगपती अदानींचे काय काम, प्रियंका गांधीचा रोकडा सवाल

Subscribe

गडचिरोली – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या विदर्भामध्ये सभा होत आहेत गडचिरोली येथील सभेत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघात केला. महाराष्ट्रात जनतेने निवडून दिलेले सरकार आमदारांना पैसे देऊन पाडण्यात आले. सरकार पाडण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये उद्योगपती गौतम अदानी हजर होते. त्या बैठकीत उद्योगपतींचे काय काम? मोदींना महाराष्ट्रात सरकार फक्त उद्योगपतींची हितासाठी स्थापन करायचे होते का? असा रोखठोक सवाल प्रियंका गांधींनी केला.

सरकार कोणाच्या हितासाठी ? 

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी गडचिरोली जिल्ह्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हजर होते.

- Advertisement -

प्रिंयका गांधी या प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. गडचिरोली येथील सभेत त्यांनी केंद्रातील भाजपचे मोदी सरकार हे शेतकरी, युवक, सर्वसामान्यांची लूट करत आहे, उद्योगपतींना कर्ज माफी देत असल्याचा घणाघात केला. भाजपला राज्यात सत्ता ही काही उद्योगपतींचे हित साधण्यासाठी हवी आहे, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या बैठकांमध्ये उद्योगपती अदानी सहभागी होत होते. सरकार स्थापन करताना उद्योगपतींचे काय काम. त्यांच्या हितासाठी, त्यांच्या भल्यासाठी भाजपला सरकार स्थापन करायचे होते का, असा सवाल त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या मालाचा भाव वाढला पाहिजे की कमी झाला पाहिजे, प्रियंका गांधींचा सवाल 

महाराष्ट्रातील आदिवासींचे हक्क गेल्या दहा वर्षांतील भाजप सरकारच्या काळात मारले जात असल्याचे त्या म्हणाल्या. 22 लाख आदिवासींनी जमिनींच्या पट्ट्यासाठी अर्ज केलेले आहेत, मात्र ते सरकारकडे पडून आहेत. आदिवासींचे जल, जंगल, जमीन हिसकावून घेण्याचे काम सुरु केले असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. मनमोहन सिंहांच्या काळात कापसाला 8 हजार रुपये दर होता, तो आता 6 हजार करण्यात आला आहे. सोयाबीनला 6 हजार रुपये भाव दिला जात होता, आता चार हजार मिळत असल्याचे सांगून प्रियंका गांधी म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या मालाचा भाव वाढला पाहिजे तर भाजप सरकारच्या काळात तो कमी होत आहे. तुम्हाला तिमच्या हिताचा विचार करणारे सरकार निवडून आणावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून ओळखळे जात होते असे सांगत प्रियंका गांधी म्हणाल्या की, आता युवकांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात होत आहे. बेरोजगारीने तरुणांना ग्रासले आहे. महायुती सरकारला अडीच वर्षांत बहिणींची आठवण झाली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसच्या पाच गॅरंटीचा उल्लेख करुन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिले.

राहुल गांधींवरील आरोपांना सडेतोड उत्तर

केंद्रातील भाजप सरकारला संविधान बदलायचे आहे. ते रोखण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. राहुल गांधी यांच्यावर आरक्षणविरोधी असल्याच्या आरोपालाही प्रियंका यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या माझा भाऊ – राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. संविधानाच्या रक्षणासाठी त्यांनी यात्र काढली. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. जातीय जनगणना करण्याचे त्यांनी ठरवले आहे. या सर्व बाबींना नरेंद्र मोदी घाबरत आहेत. म्हणून ते राहुल गांधी यांच्यावरच उलट आरोप करत आहेत. मोदींनी एकदा जाहीर करावे की ते जातीय जनगणना करणार, असे आव्हानही प्रियंका गांधी यांनी दिले.

हेही वाचा : Amit Shah : अमित शहा तातडीने दिल्लीला रवाना, विदर्भातील सभा रद्द; काय आहे कारण

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -