Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Results : विधानसभा निवडणुकीत 1000 पेक्षा कमी मतांनी विजयी झालेले...

Maharashtra Assembly Results : विधानसभा निवडणुकीत 1000 पेक्षा कमी मतांनी विजयी झालेले आमदार कोण?

Subscribe

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नुकताच पार पडली. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट बहुमत महायुतीच्या बाजूने दिल्याचे पाहायला मिळाले. यंदा विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी बऱ्याच मतदारसंघातील निकाल अनेपेक्षित लागला.

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नुकताच पार पडली. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट बहुमत महायुतीच्या बाजूने दिल्याचे पाहायला मिळाले. यंदा विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी बऱ्याच मतदारसंघातील निकाल अनेपेक्षित लागला. राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांना धुळ चारत महायुती सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, निकाल जरी अनपेक्षित लागले असले तरी, काही उमेदवार हे 1000 हून कमी मतांनी विजयी झाले आहेत, म्हणजेच या उमेदवरांचा निसटता विजय झाला आहे. (Maharashtra Assembly Results MLA who won by less than 1000 votes)

1000 पेक्षा कमी मतांनी विजयी झालेले आमदार कोण?

  • बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे 377 मतांनी विजयी झाल्या आहेत. मंदा म्हात्रे यांना एकूण 91852 मतं मिळाली आहे. मंदा म्हात्रे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून संदीप नाईक यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला असून संदीप नाईक यांना 91475 मतं मिळाली आहेत.
  • बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे 841 मतांनी विजयी झाले आहेत. संजय गायकवाड यांना एकूण 91660 मतं मिळाली आहे. संजय गायकवाड यांच्याविरोधात जयश्री शेळके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवली होती. परंतू, जयश्री शेळके यांचा पराभव झाला असून, त्यांना 90819 मतं मिळाली.
  • मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती हे 162 मतांनी विजयी झाले. मौलाना मुफ्ती यांना एकूण 109653 मतं मिळाली. मौलाना मुफ्ती यांच्याविरोधात आसिफ शेख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. आसिफ शेख यांना 109491 मतं मिळाली.
  • साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार नाना पटोले हे 208 मतांनी विजयी झाले आहेत. नाना पटोले यांना 96795 मतं मिळाली. नाना पटोले यांच्याविरोधात अविनाश ब्रह्माणकर यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. अविनाश ब्रह्माणकर यांना 96587 मतं मिळाली.

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मविआ की महायुती, छोटे पक्ष-अपक्षांची साथ कोणाला?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -