…तेव्हापासून मुख्यमंत्रिपद अजित पवारांना हुलकावणी देतंय- देवेंद्र फडणवीस

maharashtra assembly session deputy cm devendra fadanvis reaction on ajit pawar elected as leader of opposition

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे पत्र दिले होते. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षपदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी २०१४ पासून पद अजित पवारांनी हुलकावणी देत असल्याचे वक्तव्य केले आहे.

अजित पवार म्हणाले की, अजित पवारांसोबत मी माझी मैत्री आणि संबंध आहे. आणि आम्ही ७२ तासाचे मंत्रिमंडळातील सहकारी देखील आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका वादळी व्यक्तीमत्व म्हणून आपण त्यांकडे पाहू शकतो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याच मान अजित पवारांना मिळाला आहे. चार वेळा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले, २००४ मध्ये त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती, असं वाटत होत राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्याने अजित पवार मुख्यमंत्री होतील, पण त्यावेळेस त्यांच्या पक्षाने वेळा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री पद घेतले. तेव्हापासून मुख्यमंत्री पद अजित पवारांनी हुलकावणी देत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“आमच्या ७२ तासांच संपल्यानंतर आम्ही ठरवल होत की अडीच वर्ष तुम्ही इथे बसा मी तिथे बसतो, अडीच वर्षांनी मी तिथे येतो तुम्ही इथे बसा. त्यामुळे त्यांच्या जागी आज मी बसलोय आणि माझ्या जागी ते बसले आहेत. खरं तर, सहकारी बँकेचे अध्यक्ष ते उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास आहे. ज्या प्रवासात त्यांनी काही काळ खासदार म्हणूनही काम केले, पुन्हा पवारसाहेब दिल्ली गेले आणि आमदार झाले. आणि सातत्याने सात टर्म आमदार म्हणून काम करत आहे. महत्वाचे म्हणजे एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या कुटुंबात जेव्हा आपण राजकारण सुरु करतो तेव्हा आपण शेवटपर्यंत त्या छायेतून आपल्याला बाहेर येता येत नाही. शरद पवारांसारखे मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्यांचे पुतणे असलेले अजित पवार…. आज असं म्हणता येईल की, महाराष्ट्राच्या राजकारण पवारासाहेबांचे पुतणे म्हणून नाही तर स्वत:ची एक वैयक्तिक छाप, छबी अजित पवार म्हणून निर्माण केली. त्यांच्या या संपूर्ण कार्यकाळात हे ठळकपणे नमूद केले पाहिजे, अस फडणवीस म्हणाले.


एकनाथ शिंदेंकडे काय कला आहे देवाला माहीत, त्यांनी आमचाही एक आमदार फोडला – हितेंद्र ठाकूर