विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण!

maharashtra assembly speaker nana patole corona positive

पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील घरात उपचार सुरू आहेत. नाना पटोलेंसह ३५ हून अधिक आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील काही आमदार बरे झाले आहेत. तर काही आमदारांवर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वीच दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होत.

नाना पटोले यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाची झाल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना टेस्ट करावी, असे त्यांनी आवाहन केले.

दरम्यान येत्या ७ सप्टेंबरला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाला अवघे तीन दिवस असताना नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे चिंता वाढली आहे. माहितीनुसार अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांच्या कोरोना टेस्ट होणार आहेत. यामध्ये जे आमदार पॉझिटिव्ह येतील त्यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ५५ वर्षांचे पुढचे जे आमदार आहेत आणि ज्यांना इतर आजार असलेले आमदार आहेत त्यांच्याविषयी सरकारने निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील सर्व आमदार मुंबईत येतात. या दरम्यान आमदार, त्याचे पीए, अधिकाऱ्यांच्या गर्दीत भर पडण्याची शक्यता आहे. यामुळे हे अधिवेशन पार पाडण्यासाठी राज्य सरकारला कसरत करावी लागणार आहे.


हेही वाचा – पुण्याची सूत्र थोरल्या साहेबांच्या हाती; कोरोना रुग्णांसाठी दिल्या ६ कार्डियाक ॲम्बुलन्स, १५० इंजेक्शन