घरमहाराष्ट्रमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर अध्यक्षांची नाराजी

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर अध्यक्षांची नाराजी

Subscribe

नागपूर : सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला संबंधित मंत्र्यांनी उपस्थित न राहण्याचे कोणतेही कारण नाही. मंत्र्यांची अनुपस्थिती आपल्याला योग्य वाटत नाही, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीबाबत नाराजी व्यक्त केली. आज प्रश्नोत्तराच्या तासात कृषी विभागाचे तारांकित प्रश्न होते. या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार सभागृहात हजर नव्हते.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषी विभागाच्या प्रश्नाला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उत्तर देत असल्याबद्दल आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपले विभाग अन्य मंत्र्यांना वाटून दिले आहेत. त्याप्रमाणे कृषिमंत्र्यांनी आपल्या खात्याची उत्तरे शंभूराज देसाई देतील असे लिहून दिले आहे काय? असा प्रश्न केला.

- Advertisement -

लक्षवेधी सूचना सतत पुढे ढकलण्याच्या निर्णयावरही पवार यांनी नाराजी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केलेली लक्षवेधी सूचना सतत तीन दिवस पुढे ढकलण्यात आल्याबद्दलही पवार यांनी नाराजी व्यक्त केली. लक्षवेधी आता पुढील अधिवेशनात घेण्यात येईल, असे कळविले आहे. ही बाब गंभीर असून आम्हाला दुसरा उद्योग नाही का? पुढील अधिवेशनात कोण मंत्री राहील कोण नाही हे कुणालाच सांगता येत नाही, असेही अजित पवार यांनी सुनावले.


हेही वाचा : ठाकरे-शिंदेंच्या वादाचं आम्हाला देणं-घेणं नाही; छोट्या गोष्टीत रमू नका; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -