घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021 Live Update: शक्ती विधेयक विधान परिषदेत मांडण्यात...

Maharashtra Assembly Winter Session 2021 Live Update: शक्ती विधेयक विधान परिषदेत मांडण्यात आले

Subscribe

विधानपरिषदेचे कामकाज स्थगित

सोमवारी १२ वाजता विधानपरिषदेचे कामकाज सुरु होणार

- Advertisement -

राज्यात आज रात्रीपासून जमावबंदी लागू

रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू असणार

- Advertisement -

कोरोनाच्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असल्याची माहिती विधानसभेत दिली आहे. हॉलमध्ये कार्यक्रमादरम्यान ५० टक्के उपस्थिती राहील

हॉटेलमध्ये आणि जिम तसेच खुल्या जागेतील कार्यक्रमांमध्ये ५० टक्के लोकांची उपस्थिती राहू शकते. (सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा ) 


शक्ती सुधारणा कायदा विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेच्या सर्व सदस्यांनी शक्ती कायद्यावरुन राज्य सरकारचे मानले आभार ( शक्ती कायद्यातील तरतुदीबाबत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा ) 


पश्चिम महाराष्ट्राची बाजू घेतो हा गैरसमज पसरवला जात आहे.

मराठवाडा आणि विदर्भावर कोणताही अन्याय करत नाही. – उपमुख्यमंत्री अजित पवार


विधानपरिषदेत शक्ती विधेयकाचा प्रस्ताव सादर

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधेयक मांडले


विधानपरिषद सभागृहाचे कामकाज ३५ मिनिटांसाठी स्थगित


शिवसेना नेते रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवर अडवले

आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याने रामदास कदम यांना अडवले

विधानभवनात जाण्यापासून पोलिसांचा मज्जाव


Maharashtra Assembly Winter Session 2021 Live Update: अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस, मुख्यमंत्र्यांची आजही अनुपस्थिती


निलंबित १२ आमदारांबाबत विधानसभेत चर्चा सुरु

विधानसभा अधिवेशन संपण्यापुर्वी या आमदारांच्या बाबत निर्णय घेण्यात यावा अशी विनंती करतो – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


आम्हाला विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरवण्यात आला – आमदार सुधीर मुनगंटीवार


विधानभवनाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी महिलेला वेळीच रोखल्यामुळे दुर्घटना टळली

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला घेतलं ताब्यात

नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी नवे नियम लागू करुन गुन्हेगारांना आशय दिला असल्याचा आरोप या महिलेनं केला आहे.


Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक मंगळवार २८ डिसेंबरला होणार

आज सकाळी कामगार सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम ठरला. येत्या 28 डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या 27 डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.


विधानसभा हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु

विरोधक सत्ताधाऱ्यांना पेपर फुटी प्रकरणावरुन राज्य सरकारला घेरणार


विधानपरिषदेचे कामकाज सुरु

शक्ती विधेयकवार होणार चर्चा, विधानपरिषदेत शक्ती विधेयक मंजूर करण्यात येणार


राज्य सरकार लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील – सुधीर मुनगंटीवार
लोकशाहीचा अनादर होऊ नये.

राज्य सरकारने १ आठवडा अधिवेशन वाढवले पाहिजे


कमी वेळात अधिवेशन उरकणे लोकशाहीला धरुन नाही – चंद्रकांत पाटील

पेपर फुटी प्रकरणावरुन सभागृहात आक्रमक भूमिका घेणार

राज्य सरकारला केवळ ३२ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मान्य कुरुन घेण्याची इच्छा आहे.

अधिवेशन आणखी १ ते २ आठवडे वाढवावे अशी आमची इच्छा आहे. – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा )


विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमात बदल केल्यानंतर या पदासाठी आज, शुक्रवारी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २८ डिसेंबरला निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. आज अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली तर त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, २७ डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक होईल.


आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरुन चर्चा होऊ शकते.


राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या, वीज बिल प्रकरण, शेती पंप वीज खंडीत करणे, मंत्र्यांना येणाऱ्या धमक्या रोखण्यासाठी एसआयटी तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -