घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021 Live Update: विधान परिषदेत सदस्यांना निरोप देताना...

Maharashtra Assembly Winter Session 2021 Live Update: विधान परिषदेत सदस्यांना निरोप देताना मुख्यमंत्री अनुपस्थित

Subscribe

विधान परिषदेची बैठक स्थगित, मंगळवारी सकाळी १० वाजता सभागृहाची बैठक भरेल

विधान परिषद सभागृहाची बैठक आणि नियमित कामकाज दुपारी १२ वाजता सुरु होईल

- Advertisement -

विधीमंडळ परिसरात सर्वसदस्यीय फोटोसाठी रामदास कदम यांची गैरहजेरी


विधानपरिषदेचे कामकाज ३० मिनिटांसाठी तहकूब

- Advertisement -

अनिल परब यांनी विधान परिषदेत रामदास कदम यांच्यावर बोलणे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विनंतीनंतरही टाळले


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतला निकाल येईपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात असा राज्य सरकारचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर

निवडणूक आयोगाला ठराव पाठवणार


विधान परिषदेत सदस्यांना निरोप देताना मुख्यमंत्री अनुपस्थित


विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात

विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कालावधी संपलेल्या सदस्यांची निरोपाची भाषणे विधान परिषदेत सुरु

(थेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा )


विधान परिषदेचे कामकाज तहकूब,

विधान परिषद सभागृहातील कामकाज पुन्हा ३ वाजता सुरु होणार


पुण्यात संभाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
संभाजी महाराजांनी जिथे देह ठेवला त्या वणू बुद्रूक गावाचा विकास करणार.
समाधीस्थळी स्मारक बांधणार.
एक बैठक झाली. त्या बैठकीला आदित्य ठाकरेही होते.
स्पर्धा घेणार.
यासाठी विशेष कार्यक्रम योजना राबवणार
१५० कोटी निधी देणार
छत्रपती संभाजी राजांच्या सईबाई यांचं स्मारक राज गडाच्या पायथ्याशी आहे तो जीर्ण झालंय त्याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. त्यावर लवकरच बैठक घेण्याचं आणि सर्वसंमतीने जो निर्णय होईल त्यानुसार निधी मंजूर करण्याचं आश्वासन अर्थमंत्री नात्यानं पवारांनी दिलं.


ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत राज्यात निवडणुका होणार नाहीत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधानसभेत ठराव

ठराव एकमताने मंजूर

विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत निवडणुका होणार नाहीत असा ठराव मंजूर करण्यात आला


विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशीसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत हजर रालिले नाही. गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांविना राज्याचे हिवाळी अधिवेशन घेण्यात येत आहे.


ज्या संपकरी एसटी कामगारांचा आंदोलन कालावधीत मृत्यू झाला होता, त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वाववर सेवेत सामावून घेण्यात येणार – परिवहन मंत्री अनिल परब यांची विधान परिषदेत माहिती


आंदोलनकर्त्या बडतर्फ एसटी कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही – अनिल परब, परिवहन मंत्री


पडळकरांवर हल्ला होताना पोलिसांनी चित्रीकरण करण्याचे काम केले

गोपीचंद पडळकर यांच्यावर पोलीस स्थानाकाबाहेर हल्ला झाला – फडणवीस

तक्रारीनंतर पोलिसांकडून कारवाई नाही, पडळकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या राज्यात महात्मा गांधींचा अवमान झाल्यावर महाराष्ट्र सरकार हातावर हात ठेवून गप्प बसत आहे. या लोकांचे पालन पोषण तुम्ही केले आहे. १५ हजार कोटी रुपयांचा वापर पोलिसांसाठी करण्यात येतो पोलिसांनी कालीचरण महाराजांना का अटक केली नाही – सुधीर मुनगंटीवार


विधान परिषदेचे कामकाज तहकूब, १२ वाजून ५५ मिनिटांनी होणार कामकाजाला सुरुवात


विधानसभेच्या  आवारात एक सदस्य जर चुकीच्या पद्धतीने वावरत असेल तर त्याच्याविरोधात सदनाने कारवाई केली पाहिजे – नवाब मलिक


भास्कर जाधव यांच्याकडे जी क्लिप आहे त्याविरोधात फडणवीस यांच्याकडे समज दिला असल्याची व्हिडीओ आहे -चंद्रकांत पाटील

राज्यसभेत १२ खासदारांना निलंबित केलं परंतु तुम्ही १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित केलं आहे. यावरुन तुमची निती दिसते आहे. – चंद्रकांत पाटील


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला समर्थन, नितेश राणेंना निलंबित करु नका- भास्कर जाधव

नानांविरोधात कोणतेही चुकीचे विधान केलं नाही – भास्कर जाधव


एकदा पायंडा पडला तर त्यानंतर येणारे सरकार कुठल्याच विरोधकांना ठेवणार नाही – देवेंद्र फडणवीस


या ठिकाणी कायदा आणि संवाधन पाळलं जात नाही  – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नितेश राणे जे बोलले ते चुकीचे आहे – देवेंद्र फडणवीस

सत्ताधाऱ्यांना एक सदस्य निलंबित करायचा आहे – देवेंद्र फडणवीस

आमच्यावर कितीही निलंबनाची कारवाई केली तरी आम्ही लढू – फडणवीस


नितेश राणेंना निलंबित करा अन्यथा त्यांना सभागृहात हात जोडून माफी मागायला लावा – भास्कर जाधव

आम्ही लोकशाहीमध्ये लढणारे लोक आहोत – देवेंद्र फडणवीस


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात


नितेश राणेंच्या निलंबनावरुन विधानसभेत गदारोळ

विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब


विधानसभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी

नितेश राणे हाय हाय, खाली डोक वर पाय अशा घोषणाबाजी नितेश राणेंविरोधात सभागृहात देण्यात आल्या आहेत.


अंगविक्षेप केल्याबद्दल मी माफी मागितली आता नितेश राणेंनीही माफी मागावी – भास्कर जाधव


भास्कर जाधव म्हणजे काय, त्याला सांगतो दोन बिस्कीटे देतो कोणालाल तरी चावून ये,  तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव – भास्कर जाधवांचे विधानसभेत वक्तव्य

नितेश राणेंवर भास्कर जाधव यांचा घणाघात

मी काही अंगविक्षेप केल्यावर माझ्या निलंबनाची आणि माफी मागण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक तास शाब्दिक संवाद केला – भास्कर जाधव

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत भाजपच्या आमदाराने विधानसभेच्या पायरीवर निषेध करताना आवाज काढला – भास्कर जाधव

नितेश राणेंच्या म्याव म्यावचे विधानसभेत पडसाद

शिवसेनेच्या पक्षातील सर्व सदस्यांची नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी

नितेश राणेंना वारंवार समज देऊन पुन्हा वादग्रस्त विधान

नितेश राणेंनी पुन्हा आदित्य ठाकरेंविरोधात प्रतिक्रिया दिली


नितेश राणेंना निलंबित करा – शिवसेना आमदार सुहास कांदेंची मागणी

नितेश राणेंनी माफी मागावी अन्यथा निलंबित करा – सुहास कांदे

चुकीला माफी नाही


कोरोना परिस्थिती पाहून मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहतील – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे


विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलवणार – सुनील प्रभू

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाची महाविकास आघाडीला प्रतिक्षा

राज्यपालांनी निर्णय दिला नाही तर विशेष अधिवेशन घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक होईल


विधान परिषदेचे कामकाज सुरु,

विधानसभेचे कामकाज सुरु

ओबीसी आरक्षणावर होणार चर्चा

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता


विधीमंडळ पायर्‍यांवर विरोधकांचे आंदोलन आणि घोषणा

काय म्हणाले दादा, मुख्यमंत्र्यांना शोधून काढा

आम्ही तिघे भाऊ भाऊ १०० कोटी वाटून खाऊ

लोकप्रतिनिधींवर हल्ला करणाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो

हाऊस मे आओ हाऊस मे आओ, ठाकरे सरकार हाऊस मे आओ


भाजपच्या आमदारांना व्हिप जारी

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे.


ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावर निवडणूक सहा महिने पुढे ढकलावी अशी मागणी विधानसभेत करणार -विजय वडेट्टीवार

केंद्र सरकारने सुधारीत प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले

१८ जानेवारीला ओबीसी आरक्षण विषयावर सकारात्मक निकाल अपेक्षित


ओबीसी आरक्षण विषयावर विधीमंडळात सर्वपक्षीय बैठक सुरू


ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको असा ठराव मांडणार – छगन भुजबळ

सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाबद्दल ठराव मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या रिव्ह्यू पिटीशनमध्ये सहभागी होणार – भुजबळ

ओबीसी आरक्षणासंदर्भात थोड्याच वेळात विधीमंडळात बैठक होणार


विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता, राज्यपाल काय निर्णय घेणार?

राज्य सरकारच्या शिष्ट मंडळाने राज्यपाल भगतसिंग  कोश्यारी यांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम सांगितला आहे. यावर राज्यपाल निर्णय घेणार आहेत. राज्यपालांनी अद्याप निर्णय दिला नसल्यामुळे अध्यक्षांची निवडणूक होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -