Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Maharashtra Assembly Winter Session 2021 Live Update: मंत्रीमंडळातील २ मंत्री आणि ५०...

Maharashtra Assembly Winter Session 2021 Live Update: मंत्रीमंडळातील २ मंत्री आणि ५० जणांना कोरोनाची लागण – अजित पवार 

Subscribe

मंत्रीमंडळातील २ मंत्री आणि ५० जणांना कोरोनाची लागण – अजित पवार


५ दिवस  २४ विधेयके मंजूर – अजित पवार


- Advertisement -

विधानपरिषदेचे कामकाज स्थगित


राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ फेब्रुवारी २०२२ पासून नागपूर येथे होणार


- Advertisement -

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२१ विधान परिषदेत मांडण्यात आले


चर्चा न करता विद्यापिठ सुधारणा विधेयक मंजूर केले – देवेंद्र फडणवीस


सरकारच्या पापात विधीमंडळाचे सचिवालय सामिल आहे – देवेंद्र फडणवीस


चर्चा न करता विधेयक मंजूर करण्यात आले – देवेंद्र फडणवीस


ठाकरे सरकार सर्वात पुळपुटं आणि भित्र सरकार – देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्राच्या लोकशाहीतील काळा दिवस – देवेंद्र फडणवीस


यंदाचे  हिवाळी अधिवेश संपले

कोर्टाचा वेळ संपल्यामुळे भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्या होणार आहे.


कोर्टाचा वेळ संपल्यामुळे नितेश राणे आणि सावंतांच्या वकिलांनी कोर्टात वेळ वाढवून मागितला.


डान्स बार प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.


MPSC परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून २ जानेवारीला होणारी MPSCची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


सहकाराच्या बिलाला विरोध करत विधानसभेत विरोधकांचा सभात्याग


विधान परिषदेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात


उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात भाजपकडून अविश्वास ठराव केला आहे. गोऱ्हेंनी विश्वास गमावला असल्याने पदावरुन हटवण्यासाठी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.


विधान परिषदेचे कामकाज २.४५ मिनिटांपर्यंत स्थगित


खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अटकेचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला


लोकप्रतिनिधींसाठी आचारसंहितेची पुस्तिका सादर


सर्व स्तरांवरून लोकप्रतिनिधींची गळचेपी होत असल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला.


अधिकाऱ्यांना बोलण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना नाही, भास्कर जाधवांची खंत


स्वतःच्या चुकीचे वकील आणि दुसऱ्याच्या चुकीचे न्यायाधीश होता कामा नये – सुधीर मुनगंटीवार


विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात


अजित पवारांच्या निवेदनाला फडणवीसांचं समर्थन


१२ महिन्यांसाठी सदस्यांचं निलंबन योग्य नव्हे याची किमान उपमुख्यमंत्र्यांना जाणीव – देवेंद्र फडणवीस


विधान परिषद सभागृहाची नियमित बैठक १२.४५ वाजता सुरू होणार


सभागृहाची विशेष बैठक स्थगित करण्यात आली आहे.


चूक झालेल्या सदस्यांना ४ तास सभागृहा बाहेर ठेवावे, फक्त १२-१२ महिने त्यांना बाहेर ठेवू नका – अजित पवार


कुत्रे, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधित्व आपण करत नाही, सभागृहात आदर्श वर्तन झालं पाहिजे – अजित पवार


अध्यक्षांना नमस्कार करणं लोकप्रतिनिधींनी सोडून दिलं आहे – अजित पवार


लोकप्रतिनिधिंच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली पाहिजे – अजित पवार


सभासदांनी सभागृहाची प्रतिमा जपली पाहिजे, असे मत विधानसभेत अजित पवार यांनी व्यक्त केले.


लोकप्रतिनिधींच्या आक्षेपार्ह वर्तनावर विधानसभेत चर्चा सुरू


अकोला महापालिकेच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाचा विधान परिषदेत सभात्याग


विधान परिषदेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात


विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे समोर आले आहे.


सुधीर मुनगंटीवारांकडून शिवसेनेला कौरवांसोबत गेलेल्या कर्णाची उपमा


विधान परिषद १० मिनिटांसाठी तहकूब


आमदार नितेश राणेंच्या शोधात पोलिसांचं पथक गोव्यात दाखल झाले आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग पोलिसांकडून नितेश राणेंचा शोध सुरू आहे.


विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकार निवडणूक न घेण्याच्या भूमिकेत आहे. राज्यपालांचा विरोध पत्करून निवडणूक घेतल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं उत्तर आलेलं आहे. बंद लिफाफ्यातून राज्यपालांनी काय उत्तर दिलं आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ११ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता. विधानसभेचे कामकाज सुरू होईपर्यंत राज्यपालांचं उत्तर महाविकास आघाडीला अपेक्षित होत. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राला राज्यपालाचं उत्तर आलं आहे.


विधानसभेचे कामकाज सुरू; प्रश्नोत्तराच्या तासाने कामकाजाला सुरुवात


विधान भवनात सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे. विधानसभा उपाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत आमदारांच्या गैरवर्तणुकीसंदर्भात चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, बाळासाहेबर थोरात बैठकीला हजर झाले आहेत. तसेच जयंत पाटील आणि अनिल परबही बैठकीला उपस्थितीत आहेत.


अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधी पक्ष आक्रमक असल्याचे दिसत आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरू आहे.


विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून खलबतं सुरू झालं आहे. विधिमंडळात महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या दालनात महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला छगन भुजबळ, जयंत पाटील इतर महत्त्वाचे नेते पोहोचले आहेत. राज्यपालांच्या परवानगी शिवाय विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची का? आणि तसे करायचे झाले तर कोणते पर्याय उपलब्ध असतील? यासंदर्भात बैठकीत चर्चा सुरू आहे.


विधानपरिषदेच्या लक्षवेधी कामकाजाला सुरुवात


 

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निर्णय अद्याप झालेला नाही, अशी प्रतिक्रिया विधान भवनाबाहेर बाळासाहेब थोरात यांनी दिली.


नितेश राणेंबाबत स्थानिक पोलीस निर्णय घेणार – दिलीप वळसे-पाटील


आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. अजूनपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात उपस्थिती दर्शवलेली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची प्रकृती व्यवस्थिती असल्याची माहिती आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेल आहे.


आज राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. माहितीनुसार विधिमंडळात महाविकास आघाडीचे सरकार विधानसभा अध्यक्षांची निवड राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या परवानगीशिवाय करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आजही आक्रमक होताना दिसून येईल.


राज्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २८ फेब्रुवारीला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.

- Advertisment -