घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: वीज कनेक्शन नसताना शेतकऱ्याला ७० हजाराचे बिल,...

Maharashtra Assembly Winter Session 2021: वीज कनेक्शन नसताना शेतकऱ्याला ७० हजाराचे बिल, प्रवीण दरेकरांची टीका

Subscribe

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषदेत लक्षवेधीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये विरोधकांनी राज्य सरकराचे राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि वीज जोडणीच्या प्रश्नावर लक्ष वेधले आहे. यावेळी राज्य सरकारकडून दिलासादायक उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी विधानपरिषदेत गोंदळ घालत सभात्याग केला. विधानभवनाबाहेर आल्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ऊर्जाविभागात अंदाधुंदी सुरु आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्याला कृषी पंपासाठी वीज जोडणी दिली नसतानाही हजारो रुपयांचे बिल आले आहे.

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन लक्षवेधीमध्ये चर्चा केली. यावेळी राज्य सरकारला विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर आणि सदस्य सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना प्रश्न केले होते. परंतु राज्य सरकारकडून अपेक्षित उत्तर न येता विषय टाळण्याचा प्रयत्न केला यामुळे विरोधकांनी सभात्याग केला आहे.

- Advertisement -

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडली जात आहे. शेतकऱ्यांना त्रास होत असल्यामुळे त्यांसंदर्भात शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात यावी अशी लक्षवेधी आणली होती. राज्यातील शेतकऱ्यांना खोटी अवाजवी बिलं देण्यात आले आहेत. त्या बिलांमध्ये चुका आहेत. समोरच्या शेतकऱ्याचा डोळ्यासमोर पंप बंद आहे परंतु त्याला बिल देण्यात आले आहे. यावर चर्चा होती. बिलं दुरुस्ती करावी आणि अवाजवी बिलं कमी करुन एमएससीबीला आदेश द्यावेत की तोडणी थांबवावी आणि वीज जोडणी द्यावी असा सल्ला दरेकरांनी राज्य सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांचा चोर म्हणून उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, होते त्यांनी सांगितले शेतकरी चोऱ्या करतात त्याचे काय? एका बाजूला हे बळीराजा म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला चोऱ्या करतात असे म्हणतात. य़ामुळे राज्य सरकारचा धिक्कार करत भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला आहे. शेवटपर्यंत वीज कनेक्शन जोडू आणि त्यांना तात्काळ आदेश देऊ असे उत्तर न देता देशात काय चाललं आहे आणि केंद्र काय करतंय असा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना चोर बोलल्यामुळे सभा त्याग केला असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

वीज पंपाला जो़डणी नसताना अवाजवी बिल

सत्तेत असताना आंदोलन करायला लागतं तर सरकार चालवण्यासाठी सक्षम आहेत का? असा विचार केला पाहिजे. आमच्याकडे पैसे नाहीत असे ऊर्जामंत्री म्हणतात मग सोडून द्या, राज्य कारभार चालवता येत नसेल तर. मायबाप सरकार असे का म्हणतो आपण तुम्ही पालक आहात. पैसे उभारण्याची क्षमता राज्य सरकारकडे आहे. केंद्राने विशेष सवलती दिल्या आहेत. अशा वेळेला विषयामधून पळ काढण्याचे काम राज्य सरकार करत आहे. एक शेतकरी गेल्या २० वर्षांपासून वीज पंपासाठी अर्ज करत आहे. त्याला अद्याप वीजेची जोडणी करुन दिली नाही. परंतु त्याला ऊर्जा विभागाकडून ७० हजारपेक्षा अधिक रुपयांचे बील आले असल्याचे दरेकर म्हणाले.


हेही वाचा :  महापौरांच्या बालिश विधानावर बोलायचं नाही – चंद्रकांत पाटील

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -