घरमहाराष्ट्रआफताबचे 70 तुकडे केले तरी समाधान; श्रद्धा वालकर प्रकरणात अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

आफताबचे 70 तुकडे केले तरी समाधान; श्रद्धा वालकर प्रकरणात अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

Subscribe

श्रद्धा वालकर हत्याकांडनंतर राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची मागणी जोर धरत आहे. यावर आज सरकारकडूनही लवकरचं राज्यात लव्ह जिहाद संदर्भातील कायदा येणार असल्याचे सूतोवाच देण्यात आले. आमदार अतुल भातखळकर यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर विधानसभेत भूमिका मांडताना श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख केला. ज्यावर उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी श्रद्धा वालकर प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाला कडक शासन झाले पाहिजे अशी मागणी केली, ज्यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाचे 35 ऐवजी 70 तुकडे केले तरी समाधान मिळेल अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आफताब पूनावालाला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करत यात केंद्रीय गृहमंत्र्यांना लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

आफताब पूनावालाला फाशीचीच शिक्षा द्या

या प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण माणुसकीला काळिमा फासणार घटना आहे. एखाद्या कोंबडीचे 35 तुकडे करताना दहा वेळी विचार केला जातो. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी या प्रकरणाची चौकशी पूर्ण करुन सभागृहात वस्तूस्थितीची माहिती द्या. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत आफताब पूनावालाला फाशीचीच शिक्षा द्या.

- Advertisement -

आफताब पूनावाला स्वत: गुन्ह्याची कबुली देत आहे. त्यामुळे त्याला फाशीचीच शिक्षा द्यावी लागेल. आपल्याकडे जर असा काही कायदा असता की त्यानं श्रद्धाचे 35 तुकडे केले, तसे याचेही 35 तुकडे केले पाहिजेत.. 35 ऐवजी 70 तुकडे केले तरी सगळ्यांना समाधान वाटेल असा हा नालायक माणूस निघाला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

त्यासंदर्भात सरकारने गृहमंत्र्यांशी बोलून या प्रकरणाचा कसा लवकरात लवकर निकाल लागेल आणि त्याला कडक शासन होईल याबाबत आपण कार्यवाही करणार का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री फडणवीस यांना अजित पवार यांनी केला आहे.


विकास कामाच्या स्थगितीवरून विधानसभेत गदारोळ, कामकाज चारवेळा तहकूब; विरोधकांची घोषणाबाजी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -