घरमहाराष्ट्रराज्यपाल संविधानाप्रमाणे वागत नसतील तर सरकारने दोन हात करण्याची हिंमत दाखवावी -...

राज्यपाल संविधानाप्रमाणे वागत नसतील तर सरकारने दोन हात करण्याची हिंमत दाखवावी – भास्कर जाधव

Subscribe

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे. आवाजी मतदानाने निवडणूक घेणं हे घटनाबाह्य आहे, असं राज्यपालांनी राज्य सरकारला सांगितलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली आहे. राज्यपाल संविधानाप्रमाणे वागत नसतील तर महाराष्ट्र सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी, असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भास्कर जाधव विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यपालांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. यावर मी फार काही बोलणार नाही. पण कधीतरी या सरकाराला हा सामना करावाच लागेल. राज्यपाल हे केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे नोकर नाहीत. भारतीय राज्य घटनेच्या कलम १७८ नुसार राज्यपालांनी संविधानिक शपथ घेतलेली असते, त्या संविधानिक कायद्याचं पालन करेन ही शपथ घेतलेली असते. आपलं भारतीय संविधान जे सांगतं त्यानुसार राज्यपाल वागत नसतील तर कधीतरी महाराष्ट्र सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.

- Advertisement -

तेव्हा तुमचा राधा सुधा धर्म कुठं गेला

५ जुलैला मी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केलं होतं. त्यावेळी भाजपच्या नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं होतं. नितेश राणे यांनी, भास्कर जाधव यांना बिस्कीट देऊन बारा आमदारांचं निलंबन करायला लावलं असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या वेळी हरिभाऊ बागडे यांच्यासदर्भात काय बोलला असता, असा सवाल मी केला होता. साधा प्रश्न होता, अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र, तुमचे सदस्य असं वागतात तेव्हा तुमचा राधा सुधा धर्म कुठं गेला होता, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.


हेही वाचा – विधानसभा अध्यक्ष आवाजी पद्धतीने निवडणे घटनाबाह्य निवडणुकीला राज्यपालांचा ब्रेक

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -