विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी घेरणार सरकारला, पहिल्याच दिवशी पवारांच्या नेतृत्वात मोर्चा

हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आक्रमक पवित्रा घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला घेरणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकविम्याचा मुद्दा, गगनाला भिडलेली महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने या मुद्द्यावरू राष्ट्रवादी सरकारला घेरणार आहे.

sugar mills should consider cng and hydrogen production along with ethanol says ncp sharad pawar

हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आक्रमक पवित्रा घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला घेरणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकविम्याचा मुद्दा, गगनाला भिडलेली महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने या मुद्द्यावरू राष्ट्रवादी सरकारला घेरणार आहे. नागपूरमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विधानभवनावर तब्बल १ लाख लोकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचा हा मोर्चा शरज पवारांच्या नेतृत्वाखाली निघणार असल्याने अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Assembly Winter Session Nagpur Ncp Sharad Pawar Agitation Against Shinde Fadanvis Government )

मागील दोन वर्ष कोरोनामुळे हे हिवाळी अधिवेश मुंबईत होत आहे. यंदा १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या चार महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपासोबत युती करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना केली. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. दरम्यान, या सरकारला आता जवळपास ४ महिने उलटून गेले आहेत. मात्र, ओला दुष्काळाचा मुद्दा, पीक विम्याचा प्रश्न, महागाई, राज्यपालांची विधाने, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यावरुन विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. यासाठीच्या एकत्रित रणनीतीसाठी महाविकास आघाडीची बैठकही मुंबईत पार पडली आहे.

या हिवाळी अधिवेशनादिवशी काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली. “नव्या सरकारच्या कामावर राज्यातील जनता नाराज आहे. याचमुळे सरकारविरोधात जनतेमध्ये मोठा रोष आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात लाखो लोकांच्या साक्षीने हा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर विशिष्ट जबाबदारी देण्यात आलेली आहे”, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.


हेही वाचा – माझं रक्त शिवसेनेचं, उद्धव ठाकरेंसोबतच…, मनोहर जोशींनी केलं स्पष्ट