Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश अरे बापरे! बेरोजगारीमुळे महाराष्ट्रात इतक्या लोकांनी संपवले जीवन

अरे बापरे! बेरोजगारीमुळे महाराष्ट्रात इतक्या लोकांनी संपवले जीवन

Subscribe

कोरोना महामारीनंतर आर्थिक अडचणींमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. अशात महाराष्ट्रात बेरोजगारीमुळे सर्वांधिक लोकं आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रांच्या अहवालातून उघड झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून (NCRB) ही आकडेवारी समोर आली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मागील दोन वर्षांपासून एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

एनसीआरबीचा अहवाल नेमका काय सांगतो?

गृहखात्याच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा 2019 ते 2021 चा देशातील कोणत्या राज्यात किती आत्महत्या झाला याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्र सर्वात टॉपवर असून 2021 च्या आकडेवारीनुसार, एकट्या महाराष्ट्रात 22207 आत्महत्या झाल्या आहेत. यानंतर तामिळनाडूत 18,925 आणि तिसऱ्या क्रमांकावर मध्यप्रदेशाच 14,965 आत्महत्या झाल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे 2021 आधी 2020 मध्येही महाराष्ट्राचं आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक होते. 2020 मध्ये महाराष्ट्रात जवळपास 19909 लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर त्यापूर्वी 2019 मध्ये 18916 आत्महत्यांसह महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आत्महत्येंच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतेय.

- Advertisement -

NCRBच्या अहवालात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे की, राज्यांतील आत्महत्यांच्या या घटनांमागे विविध कारणं आहेत. मात्र यात बेरोजगारी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेक जण चांगले शिक्षण असून मनासारखी नोकरी, पगार नसल्यामुळे आत्महत्येचा विचार करत आहे. यात तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

सर्वाधिक कमी आत्महत्येचे प्रमाण नागालँड राज्यात आहे. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीपमध्ये सन 2021 मध्ये केवळ एकाच व्यक्तीनं आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद आहे. सर्व राज्यांनी पाठवलेल्या आकडेवारीच्या आधारे देशातील सर्व राज्यांचा एकत्रित डेटा NCRB नं जाहीर केला आहे.


राज्यभरातील 7135 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल होणार जाहीर

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -