घरमहाराष्ट्रटेरर फंडिंगप्रकरणी पुण्यातील तरुणाला एटीएसकडून अटक; अतिरेक्यांना पाठवले 10 हजार रुपये

टेरर फंडिंगप्रकरणी पुण्यातील तरुणाला एटीएसकडून अटक; अतिरेक्यांना पाठवले 10 हजार रुपये

Subscribe

टेरर फडिंगप्रकरणी आज पुणे दहशतवादी पथकाने (Pune ATS) एका तरुणाला अटक केली आहे. जुनेद मोहम्मद (वय18) असे तरुणाचे नाव असून त्याला दापोडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका दहशतवाद्याच्या संपर्कात होता. यामाध्यमातून राज्यात मोठा घापपात घडवून आणण्यासाठी त्या तरुणाला काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून पैसे पुरवण्यात आल्याचा एटीएसला संशय आहे.

पुणे एटीएसच्या माहितीनुसार, संबंधीत तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून काश्मीरमधील गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेच्या संपर्कात आला. (Jammu and Kashmir terror activities) दरम्यान संघटनेने महिन्याभरापूर्वी या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. संबंधीत आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील रहिवासी आहे. मात्र गेल्या अनेक काळापासून तो दापोडी येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत तेथील एका भंगार विक्रेत्याच्या दुकानात काम करत होता. दरम्यान तो फोनच्या माध्यमातून या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात राहत होता. यासाठी त्याने अनेकदा आपला फोन नंबर देखील बदलला. यात त्याच्या फोनमधील काही नंबर पाकिस्तानचे असण्याची शक्यताही वर्तवली जातेय. या संघटनेत  झालेल्या दहशतवादाशी संबंधित अनेक चर्चेचा भाग होता.

- Advertisement -

त्यामुळे संघटनेने तरुणाला नेमके हे पैसे का पाठवले? या पैशांचे तो काय करणार होता? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र हे पैसे दहशतवादी कृत्यांसाठीच वापण्यात येणार होते असा आरोप एटीएसने केला आहे. दरम्यान आरोपीला आज दुपारी पुणे न्यायालयात हजर केले जाणार असून या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी त्याच्या कोठडीची मागणी केली जाईल.

- Advertisement -

दरम्यान अटकेतील आरोपी जुनेद मोहम्मद (Junaid Mohammad arrested in Pune) हा अवघा 18 वर्षांचा असून तो बेरोजगार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. यावेळी काश्मीरमधील एका संघटनेने त्याला राज्यात घातपाती कृत्य घडवून आणण्यासाठी महिन्याभरापूर्वी 10 हजार रुपये पाठवले होते. तरुणाच्या बँक अकाऊंटवर हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून एटीएस संबंधीत आरोपीच्या मागावर होते. मात्र आज अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्य़ा आहेत.


Monsoon Update : मुंबईसह कोकणात रिमझिम पावसाला सुरुवात: संपूर्ण भारतात या दिवशी दाखल होणार मान्सून

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -