औरंगाबमधील प्रसिद्ध यूट्युबर बिंदास काव्या बेपत्ता; पोलिसांत गुन्हा दाखल

maharashtra aurangabads famous minor youtuber bindas kavya is missing

औरंगाबादमधील प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर बिंदास काव्या काल दुपारपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी यूट्युबरच्या आईने औरंगाबादमधील छावणी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला आहे. या अल्पवयीन यूट्यूबर मुलीचे यूट्युबवर 4.32 मिलियन सबस्क्रायबर आहेत.

दरम्यान तिच्या आईने सोशल मीडियावर तिला परत येण्याचे आवाहन करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र काव्याच्या अचानक गायब होण्याने सोशल मीडियावर एकचं खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इनफ्लूयन्सर म्हणून ओळखी जाणारी बिंदास काव्या 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता रागाच्या भरात घराबाहेर निघून गेली, यानंतर ती परतलीच नाही. संध्याकाळ उजाडला तरी ती परत न आल्याने कुटुंबिय घाबरून गेले आहेत. दरम्यान काव्याने मोबाईल बंद ठेवल्याने कुटुंबिय अधिकच चिंतेत आहेत. तिच्या कुटुंबियांनी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत काव्या अल्पवयीन असल्याचे म्हणत अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

औरंगाबादच्या पडेगावात आई वडिलांसह राहणारी काव्या मागील वर्षभरात युट्युबवर प्रसिद्धीच्या झोतात आली. युट्यूबवर तिच्या व्हिडिओंना जवळपास 5 ते 45 मिनिलन व्ह्यूज मिळतात. साडेचार मिलियन सबस्क्राईब असलेली काव्या वडिलांसोबतच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली. युट्यूब व्यतिरिक्त ती इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही प्रसिद्ध आहे.

काव्या घरातून शेवटी निळी जीन्स, पांढरे शूड आणि तोंडाला स्कार्फ परिधान करुन बाहेर पडली होती. एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ती कैद झाली आहे. दरम्यान तिच्या आई वडिलांना विविझ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिला परत येण्याचे आवाहन केले आहे, तसेच ती बेपत्ता झाल्याची रितसर तक्रार पोलिसांकडे केली आहे. दरम्य़ान छावणी पोलिसांकडून सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू आहे.

बिंदास काव्याचे खरे नाव काव्यश्री यादव असे आहे. महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये 30 मार्च 2004 रोजी तिचा झाला. वयाच्या 15 व्या वर्षी तिला लोकप्रियता मिळाली. काव्याला व्हिडीओंसाठी तिचे आई-वडिल फार सपोर्ट करतात. काव्याचे Bindas Kavya नावाने यूट्यूब चॅनेल असून त्यावर ती व्लॉग अपलोड करत असते. नोव्हेंबर 2017 मध्ये हे चॅनल तिने सुरू केले होते. काव्याने कमी वयात youtube वर यशस्वी भरारी घेतली आहे.


संजय राऊतांच्या सुटकेसाठी सुनील राऊत दिल्लीत