Maharashtra Band : हा बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद – फडणवीस

Maharashtra Band : महाराष्ट्र बंदमुळे राज्य सरकारचा ढोंगीपणा उघड, फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

maharashtra band is state government sponsored terrorism fadnavis allegations on maha vikas aghadi
Maharashtra Band : हा बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद - फडणवीस

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा पुन्हा एकदा महाराष्ट्र बंदमुळे उघड झाला आहे. राज्य सरकारला महाराष्ट्र बंद करण्याची नैतिकता आहे का? हा बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सरकारला महाराष्ट्र बंद करण्याची नैतिकता आहे का? असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केला आहे. लखीमपुरच्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद करण्यात येतो परंतु महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या पैशाची मदत करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपुर्व संकटात असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील सरकारला आंदोलन करण्याची नैतिकता आहे का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा असून आता ढोंगीपणा जगासमोर उघड झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. लखीमपुरच्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद करण्यात येतो. परंतु राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या पैशाची मदत करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या घोषणा केल्या, नुकसानीची मदत करण्याच्या घोषणा केल्या त्या हवेत विरल्या आहेत. अजून शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तींवर मदत केली नाही. ज्या शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे ती, तोकडी पडली आहे. शेवटी एका घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की, पुर्वीच्या फडणवीस सरकारने चांगली मदत केली. आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

इतिहासात प्रथमच मंत्रिमंडळ बैठकीचा दुरुपयोग

महाराष्ट्रात संविधानाची पायामल्ली करणं चाललं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे. ते कॅबिनेटमध्ये निर्णय करतात. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन महाराष्ट्र बंदचा निर्णय जाहीर होतो. देशाच्या इतिहासामध्ये मंत्रिमंडळ बैठकीचा दुरुपयोग अजूनही कोणी केला नाही. एक प्रकारे संपुर्ण संवेधानिक व्यवस्थेला आव्हान देण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारकडून चालू असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

गोळीबार करणाऱ्यांना आंदोलनाची नैतिकता आहे का?

या सरकारमध्ये तीच लोकं आहेत ज्या लोकांनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. या गोळीबार करणाऱ्या सरकारला नैतिकता आहे का आंदोलन करण्याची असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाराष्ट्र बंद राजकीय पोळी भाजण्यासाठी

लखीपुर खीरीतील घटना दुर्दैवी आहे परंतु हा बंद संवेदना दाखवण्यासाठी नाही तर राजकीय पोळी भाजता येईल का या विचाराने केलेला हा बंद असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या बंदला प्रतिसाद नाही मात्र प्रशासनाची मदत घेऊन, दमदाटी करुन पोलीस प्रशासन, जीएसटी प्रशासन या सगळ्याचा वापर करुन लोकांना बंद ठेवण्यासाटी प्रवृत्त केलं जात असल्याचे सांगत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

आंदोलन सरकार पुरस्कृत

ईस्टर्न एक्सप्रेसवेवर महाविकास आघाडी सरकारमधील १० कार्यकर्ते मार्ग रोखून धरतात. त्या रस्त्यावर टायर जाळून जाळपोळ करतात पोलीस प्रशासन तेथे उपस्थित आहेत. पंरतु पोलीस कारवाई करत नाही. एकूणच हे सरकार पुरस्कृत दहशतवाद सुरु असल्याचे दिसत आहे. असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.


हेही वाचा : महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला आहे, जो काही बंद तो भीतीने – चंद्रकांत पाटील