Maharashtra Bandh 2021: ‘मुघलांच राज्य, त्यांच्या राजवटीत महिलांचा मानसन्मान नाही’, सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Bandh 2021 supriya sule slams modi goverment Lakhimpur Kheri Violence and rape case
Maharashtra Bandh 2021: 'मुघलांच राज्य, त्यांच्या राजवटीत महिलांचा मानसन्मान नाही', सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

‘हे तर मुघलांचे राज्य आहे. त्यांच्या राजवटीत महिलांचा मानसन्मान नाही.’ अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. लखीमपूर खेरी हत्याकांडाप्रकरणी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे या हुतात्मा चौकात आल्या होत्या. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात घणाघाती टीका केली आहे.

“केंद्र सरकार हे मुघलांचं राज्य”

“केंद्र सरकार हे मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात उचलला नाही. छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मान केला. मात्र या मुघलांच्या राज्यातील महिल्यांवरील अत्याचारांचा घटना हा इतिहास आपण पाहतोय. अर्थात हे मुघलांचे राज्य चालले आहे. त्यांच्या राजवटीत महिलांचा मानसन्मान दिसत नाही. या देशातील महिला अबला असल्याचे त्यांना वाटतेय. यात महाराष्ट्रातील मुली मग ती सावित्री असू दे अहिल्या देवी किंवा राणी लक्ष्मीबाई… त्यांचे कर्तृत्व सरकार विसरलय. म्हणून महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण महाराष्ट्रातील लेकी अत्याचारांविरोधात खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होतील. कारण त्या जिजाऊंच्या लेकी आहेत.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“राजकारणातील माणुसकी केंद्रातील सरकारने पूर्णपणे संपवून टाकली”

लखीमपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेविरोधातही त्यांनी केंद्रावर टीका केली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “लखीमपूर हिसेंच्या घटनेप्रमाणे देशभरात आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांवर जो अन्याय होताना दिसतोय त्याच्याविरोधात हा मोठा बंद महाराष्ट्रात होत आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आम्ही सगळे जमलेले आहोत. विरोधी पक्षांकडून बंदला होत असलेला विरोध हे दुर्दैवी आहे. कारण माणूसकी ही राहिलीच नाही. राजकारणात एक काळ असा होता की, राजकरणात माणुसकी जिवंत होती, मात्र जी आत्ता केंद्रात असलेल्या सरकारने पूर्णपणे संपवून टाकली आहे. हा बंद ज्या लोकांचा खून ज्यांनी केल्याय त्यांच्याविरोधात आहे. आजही शेतकऱ्यांना चिरडण्याचा व्हिडिओ पाहिला की अंगावर शहारे येतात. इतका क्रूरपणा तुम्ही कधी पाहिलेला आहे का? ही अत्यंत क्रूर घटना आहे त्यामुळे यावर जाहीर निषेध करुन संपणार नाही, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला अटक करण्यासाठी इतका वेळ लागतोय. ही सत्तेची मस्ती आहे. उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत चुकीची आहे, असं सांगत नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रातील मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.


Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला विरोध करण्यासाठी रस्त्यावर येऊन दाखवावं; संजय राऊतांचं आव्हान