घरमहाराष्ट्रसोयीनुसार ‘महाराष्ट्र भूषण' कार्यक्रम घेतला; संजय राऊतांचा सरकारवर आरोप

सोयीनुसार ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रम घेतला; संजय राऊतांचा सरकारवर आरोप

Subscribe

हा कार्यक्रम जर संध्याकाळी झाला असता तर घडलेली दुर्घटना कदाचित टळली असती. पण गृहमंत्र्यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे राऊत म्हणाले. सर्व व्हीआयपी छपराखाली होते आणि आप्पासाहेबांचे अनुयायी मात्र तळपत्या उन्हात होते. उष्माघातामुळे झालेले मृत्यू हे अत्यंत दु:खद आहेत.

नवी मुंबई खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक आले होते. मात्र उष्माघातामुळे 11 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. यावर राजकीय वर्तुळाकतून अनेकक प्रतिक्रिया समोर आल्या. त्यानंतर आता या सर्व प्रकारावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर आरोप केला आहे. राऊत म्हणाले की, सोयीनुसार कार्यक्रम घेण्यात आला. ( Maharashtra Bhushan program according to convenience of Amit Shah Sanjay Raut’s accusation against the government )

महाराष्ट्राला चटका लावणारी घटना

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात जे झालं ती महाराष्ट्राला चटका लावणारी घटना असल्याचं, राऊत म्हणाले. आप्पासाहेबांचे लाखो श्रीसेवक जमले होते. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली नव्हती. ही तयारी फक्त व्हीआयपी लोकांसाठी करण्यात आली होती, असं मला वाटतं. या कार्यक्रमात लाखो भक्तांची सोय न पाहता गृहमंत्री अमित शाह यांची सोय पाहिली गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हा कार्यक्रम जर संध्याकाळी झाला असता तर घडलेली दुर्घटना कदाचित टळली असती. पण गृहमंत्र्यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे राऊत म्हणाले. सर्व व्हीआयपी छपराखाली होते आणि आप्पासाहेबांचे अनुयायी मात्र तळपत्या उन्हात होते. उष्माघातामुळे झालेले मृत्यू हे अत्यंत दु:खद आहेत.

- Advertisement -

जशी शिवसेना फोडली तशीच राष्ट्रवादी तोडण्याचा डाव

शिवसेना पक्ष जसा ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणा लावून फोडण्यात आला तसाच राष्ट्रवादी काॅंग्रेसचा पक्षा फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचं, राऊत म्हणाले. काही प्रकार आता सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या काही आमदारांवर सध्या कारवाया सुरु आहेत. त्यांनावर राष्ट्रवादी सोडण्याचा दबाव टाकला जात आहे. या दबावामुळे जर कोणी पक्षातून बाहेर पडणार असेल तर त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे, पक्षाचा नाही, राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असं शरद पवार यांचं स्पष्ट मत असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.

 ( हेही वाचा: …म्हणून कार्यक्रम दुपारी ठेवला का? ठाकरेंचा सवाल तर कार्यक्रमाच्या नियोजनावर अजित पवारांचा आक्षेप )

- Advertisement -

अजित पवार जातील असं वाटत नाही

अजित पवार हे काल आमच्यासोबत होते. नागपूरच्या सभेतून परत येताना ते आमच्यासोबत होते. त्यावेळी त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यावरुन तरी अजित पवार राष्ट्रवादी सोडून जातील असं मला वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -