घरमहाराष्ट्रMaharashtra Board Exam : परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकारांना आळा घाला, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Maharashtra Board Exam : परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकारांना आळा घाला, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Subscribe

बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधी होणार आहे, तर दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च यादरम्यान होणार आहे.

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधी होणार आहे, तर दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च यादरम्यान होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.

दहावी आणि बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमी आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, योजना शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi On Gandhi : दोन कमांडर नसल्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे एवढे बोलले; पंतप्रधान मोदींचा टोला

या परीक्षांसाठी दहावीसाठी 13 परिरक्षक तर, बारावीसाठी 12 परिरक्षक कार्यालये आहेत. दहावीसाठी एकूण 426 शाळा मुख्य परिक्षा केंद्रे 73 आणि 18 हजार 323 विद्यार्थी संख्या आहे. बारावीसाठी 154 कनिष्ठ महाविद्यालये 38 मुख्य परीक्षा केंद्रे,17 हजार 489 विद्यार्थी संख्या आहे. जिल्ह्यात मागील 5 वर्षांमध्ये एकही संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्र आढळून आले नाही. एकूण सहा भरारी पथके जिल्ह्यात असणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – PM Narendra Modi : आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर; राहुल गांधींच्या टीकेला मोदींचं उत्तर

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जिल्ह्यात कोठेही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलीस विभागाने विशेष सुरक्षा विशेषत: पेपर्ससंदर्भात ठेवावी. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी अर्धा तास आधी एस टी पोहचेल, अशी सुविधा ठेवावी. वीज वितरण कंपनीने वीज सुरळीत राहील, याची जबाबदारी पूर्ण करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -